Live News Updates 22 January 2023: मुंबईतील गिरगावात घर कोसळलं, एकाची प्रकृती चिंताजनक-live news updates 22 january 2023 ,latest news बातम्या
मराठी बातम्या  /  latest news  /  Live News Updates 22 January 2023: मुंबईतील गिरगावात घर कोसळलं, एकाची प्रकृती चिंताजनक
Marathi News Live Updates
Marathi News Live Updates(HT)

Live News Updates 22 January 2023: मुंबईतील गिरगावात घर कोसळलं, एकाची प्रकृती चिंताजनक

Ashwjeet Rajendra Jagtap 03:33 AM ISTJan 23, 2023 09:03 AM
  • twitter
  • Share on Facebook

Mumbai Breaking News : गिरगावातील श्रीपती ज्वेलर्स बिल्डिंगमधील घर कोसळलं असून त्यात एक जण गंभीर झाल्याची माहिती आहे. कृष्णा पटेल असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे.

Sun, 22 Jan 202306:18 PM IST

House Collapse : मुंबईतील गिरगावात घर कोसळलं, एक जखमी

House Collapse In Girgaon : मुंबईतील गिरगावात घर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. गिरगावातील श्रीपती ज्वेलर्स बिल्डिंगमधील घर कोसळलं असून त्यात एक जण गंभीर झाल्याची माहिती आहे. कृष्णा पटेल असं जखमी झालेल्या मुलाचं नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sun, 22 Jan 202308:46 AM IST

Jammu-Srinagar National Highway: समरोली, उधमपूर येथील देवल पुलावर दरड कोसळली

समरोली, उधमपूर येथील देवल पुलावर दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे

Sun, 22 Jan 202308:04 AM IST

Pune: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा;  गो हत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कायद्याची मागणी

Hindu Jan Aakrosh Morcha: धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद आणि धर्मांतरासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, अशा मागणींसाठी  हिंदू जन आक्रोश मोर्चाला लाल महाल येथून सुरवात झाली आहे.

Sun, 22 Jan 202302:21 AM IST

Bharat Jodo yatra: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात

Congress: जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आहे.

Sun, 22 Jan 202301:35 AM IST

Uttrar Pradersh Crime:  रेल्वेतून प्रवास करताना महिलेचा विनयभंग, आरोपी अटकेत

उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेतून प्रवास करताना रेल्वे कर्मचाऱ्याने आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिला प्रवाशाने दिली आहे. आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे