मराठी बातम्या  /  latest news  /  IND vs AUS Playing 11: हैदराबादेत पडणार धावांचा पाऊस? जाणून घ्या पीच रिपोर्ट आणि प्लेईंग ११

IND vs AUS Playing 11: हैदराबादेत पडणार धावांचा पाऊस? जाणून घ्या पीच रिपोर्ट आणि प्लेईंग ११

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 25, 2022 05:45 PM IST

IND vs AUS Playing 11 and pitch report: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

IND vs AUS
IND vs AUS

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये ही टक्कर होणार आहे. सध्या ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ हा सामना जिंकून ट्रॉफीवर कब्जा करायच्या प्रयत्नात असतील.

पहिला T20 ऑस्ट्रेलियाने ४ विकेटने जिंकला. यानंतर भारताने अतुलनीय पुनरागमन करत पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या टी-20म ध्ये पाहुण्या संघाचा ६ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेलने गोलंदाजीत कमाल दाखवत दोन विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने ४६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.

भुवनेश्वर कुमार इन, पंत आऊट?

सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-११ वर खिळल्या आहेत. दुसरा सामना पावसामुळे ८-८षटकांचा खेळवला गेला. त्यामुळे एक अतिरिक्त फलंदाज म्हणून टीम इंडियाने भुवनेश्वर कुमारच्या जागी भारताने ऋषभ पंतला प्लेइंग-११ मध्ये स्थान दिले होते. आता या निर्णायक सामन्यात भुवी संघात पुनरागमन करू शकतो. ऑस्ट्रेलिया संघाबाबत बोलायचे झाले तर, डॅनियल सॅम्सच्या जागी जोश इंग्लिसचे प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते.

पीच फलंदाजीसाठी अनुकूल

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची विकेट फलंदाजीला अनुकूल मानली जाते. वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

दोन्ही देशांचे संभाव्य प्लेइंग-११

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), जोस इंग्लिस, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कॅमरुन ग्रीन, अॅडम झाम्पा, पॅट कमिन्स, जोस हेझलवूड, नॅथन एलिस.

WhatsApp channel

संबंधित बातम्या