मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Zoya Akhtar Birthday: झोया अख्तरचा पहिला सिनेमा माहिती आहे का?

Zoya Akhtar Birthday: झोया अख्तरचा पहिला सिनेमा माहिती आहे का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 09, 2024 08:32 AM IST

Zoya Akhtar Birthday Special: आज ९ जानेवारी रोजी झोयाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Bollywood film director Zoya Akhtar (Photo by SUJIT JAISWAL / AFP)
Bollywood film director Zoya Akhtar (Photo by SUJIT JAISWAL / AFP) (AFP)

बॉलिवूडमधील आघाडीची दिग्दर्शिका म्हणून झोया अख्तर हे नाव चटकन घेतले जाते. आई अभिनेत्री, वडील प्रसिद्ध लेखक आणि विवध कलागुण असलेला भाऊ अशा परिवारात झोयाला चित्रपटाची आवड निर्माण होणे ही काही वेगळी गोष्ट नाही. तिला देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे होते. पण झोयाचा पहिला सिनेमा कोणता? हे तुम्हाला माहिती आहे का? आज ९ जानेवारी रोजी फराहचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

लेखक, कवि, चित्रपटसृष्टीतील कलाकार यांच्या सानिध्यात झोया लहानाची मोठी झाली होती. तिला देखील बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. तिने ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. तिच्या या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई केली नाही. पण हळूहळू झोया नाव कमावत गेली. तिचे चित्रपट हिट ठरु लागले होते.
वाचा: भारत-मालदीव वादावर अमिताभ बच्चन बोलले! म्हणाले, मी लक्षद्वीपला जाऊन आलोय, तिथं…

झोयाला वैद्यकीय क्षेत्रात आणि लॉमध्ये करियर घडवायची इच्छा होती. पण ते शक्य न झाल्याने झोयाने मोर्चा चित्रपटनिर्मितीकडे वळवला. तिला खरी ओळख ही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातून मिळाली. या प्रमाणेच झोयाचा आता ‘जी ले जरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ३ मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

झोयाला प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ हा चित्रपट पाहून दिग्दर्शनाची प्रेरणा मिळाली. या एका चित्रपटाने झोयाचे करिअर बदलले. काही दिवसांपूर्वीच झोयाचा 'द आर्चिस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चित्रपटात बॉलिवूडमधील स्टारकिड्सची वर्णी पहायला मिळाली होती. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी खूशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

WhatsApp channel

विभाग