मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tv Serial: झी मराठीवरील आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tv Serial: झी मराठीवरील आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 21, 2024 12:08 PM IST

Zee Marathi New Serial: गेल्या काही दिवसांपासून अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळते. आता आणखी एका नव्या मालिकाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Zee Marathi new Serial
Zee Marathi new Serial

New Tv Serial: आजकाल वेगवेगळ्या पठडतील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नवीन विषय आणि वेगवेगळे कलाकार हे आजकालच्या मालिकांमध्ये विशेष पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. आता या यादीमध्ये आणखी एक मालिका आली आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमध्ये आणखी एक मालिका वाढली आहे.

झी मराठीवर पारू आणि शिवानंतर 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा 'अक्षय म्हात्रे' लवकरच 'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. ह्या मालिकेच्या निमित्ताने अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा एका मराठी डेलीसोप मध्ये दिसणार आहे आणि अक्षयची साथ देणार आहे ‘अक्षया हिंदाळकर’.
वाचा: अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करताच मागितली माफी

प्रेक्षकांनी एका सुंदर आणि इमोशनल गाण्याद्वारे या मालिकेची झलक पाहिली असेलच. या मालिकेचे लेखन केलय सुखदा अहिरे हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत शैलेश डेरे. तर टेल अ टेल मीडिया या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

ट्रेंडिंग न्यूज

'नवरी मिळाले हिटलरला' मधल्या अभिराम जहागीरदारने म्हणजेच राकेश बापट याने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवले असतानाच आता अक्षय म्हात्रेची नवी मालिका येत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता पाहायला मिळते. पण आता दुसरी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

झी मराठीवरील नवी मालिका पारो विषयी

'पारो' या मालिकेत शिस्तबद्ध, करारी स्वभावाच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या घरात अल्लड, निरागस आणि बिंदास्त स्वभावाच्या पारोची कथा दाखवण्यात आली आहे. पारोची एण्ट्री ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. त्यामुळे आगामी भागात मालिकेत काय घडणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ही मालिका झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे.

'शिवा'

शाल्व किंजवडेकरने झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेतून पुनरागमन केले आहे. या मालिकेची कथा ही आशु या पात्राभोवती फिरताना दिसते. आईचा लाडका आशु कुटुंबाची शान आहे. आशुच्या जीवनात, शिवाची एन्ट्री काय धुमाकूळ घालते हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. १२ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

WhatsApp channel