सध्या मालिका विश्वात काही मालिका प्रचंड चर्चेत आहेत. ‘शिवा’ ही अशाच काही मालिकांपैकी एक आहे. ‘शिवा’ या मालिकेतील शिवानी म्हणजेच शिवा आणि आशुतोष यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेच्या येत्या भागांमध्ये अतिशय धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. शिवा आणि आशूचे लग्न झाले आहे. त्यानंतर त्यांच्या आयुष्याते अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे.
वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु, शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो. पण घरी येताच सिताई शिवाला शिक्षा देते आणि घरातील गाड्या आणि अंगण स्वच्छ करायला लावते. शिवा वस्तीत जाऊन पुन्हा आपल्या शिवा कपड्यांमध्ये येऊन दहीहंडी फोडते म्हणून सिताई शिवाशी अबोला धरते.
शिवाचे सीताईला मनवायचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. शिवा डोसा बनवते आणि त्याच्यावर चटणीने सॉरी लिहते. सिताईला हे आवडत नाही. शिवा असे कपडे इथुन पुढें कधीचं घालणार नाही असे वचन सिताईला देते. शिवा सिताई बरोबर भाजी मार्केट मध्ये जाते तेंव्हां तेथील व्यापारी गुंड हप्तावसुली करत असल्याचं शिवाला कळत. शिवा सिताईच्या नजरेत न येता गुंडांना धडा शिकवते. वस्तीतील शाळेची पडझड झाल्याने शाळा बंद पडणार आहे हे जेव्हा शिवा कळत ती शाळेची मदत करायची ठरवते. शिवाला मदत करताना पाहून, आशू शिवाला मदत करायची ठरवतो. या सगळ्यामुळे शिवा आणि सिताईच्या नात्यात गोडवा येईल? असे प्रश्न पडले आहेत.
वाचा: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व खिंजवडेकर 'शिवा' मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच शिवा भूमिकेतच अभिनेत्री पूर्वा फडके ही मुख्य भूमिकेत दिसरणार आहे. शाल्वला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे शिवा या मालिकेची ते आतुरतेने वाट पाहात होते. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची दुसरी कन्या आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरची बहिण मीरा वेलणकर ही मालिकेत दिसत आहे. मीरा वेलणकर ही झी मराठीवरील 'शिवा' या मालिकेत दिसत आहे. 'शिवा' मध्ये मीराची महत्त्वाची भूमिका आहे. मीरा वेलणकर या मालिकेतील मुख्य व्यक्तीरेखा असलेल्या आशूची आई सीताईची व्यक्तिरेखा साकारत आहे.