गेले वर्षभर 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडत आहे कारण मालिकेत उमाची भूमिका साकारणारी खुशबू तावडे म्हणजेच उमाई मालिकेला निरोप देत आहे. खुशबू मालिका सोडणार असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. त्यांना प्रश्न पडला आहे की तिने मालिका का सोडली? तसेच आता मालिकेत उमाईची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न देखील चाहत्यांना सतावत आहे.
खुशबू तावडे चाहत्यांना एक गूड न्यूज देत आहे. खुशबू पुन्हा एकदा आई होणार आहे. प्रत्येक स्त्री प्रमाणे खुशबूने आपला गरोदरपणाचा ७ महिन्याचा प्रवास काम करत पूर्ण केला. पण आता ती काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहे. तिच्या जागी एक नवी अभिनेत्री मालिकेत दिसणार आहे.
'सारं काही तिच्यासाठी' शूटिंग करण्याचा अनुभव अदभूत होता. सुरवातीला मला माहिती नव्हतं की हा प्रवास कसा असणार आहे. कारण सगळं नवीन होतं माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी नाहीतर प्रोडक्शनसाठी ही, पण मी स्वतःला एक मंत्र समजावलं होता की आजचा दिवस आणि आजचा क्षण हा जास्त महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस नव्याने सामोरे जायचं आणि काम करायचं. शूट करताना मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली. ह्या ८ महिन्यांच्या प्रवासात एक नवीन खुशबु सापडली आणि मला ह्यासाठी प्रोडक्शन आणि झी मराठीचे खूप खूप आभार मानायचे आहेत. जसं ही बातमी मी माझ्या घरच्यांना सांगितली त्यांना जितका आनंद झाला तितकाच माझ्या झी मराठीच्या कुटुंबाला सुद्धा झाला. प्रत्येकानी उत्तम प्रकारे मला प्रतिसाद दिला, हिम्मत वाढवली" असे खुशबू म्हणाली.
Phir Aayi Hasseen Dillruba Review: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा 'फिर है हसीन दिलरुबा'चा रिव्ह्यू
खुशबूने 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत आता उमाची भूमिका कोण साकारणार याविषयी सांगितले आहे. "उमाचा प्रवास पुढे पल्लवी वैद्य सांभाळणार आहे, नवीन उमाची भूमिका पल्लवी वैद्य साकारणार आहे. मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवी सारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. माझी कायम ह्या मालिकेसाठी ही इच्छा आहे की मालिकेचा पुढचा प्रवास सुंदर होऊ दे कारण मला 'सारं काही तिच्यासाठी' ने भरभरून दिले आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे. मला पल्लवीचे मनापासून आभार मानायचे आहेत. मी पुन्हा एकदा लास्ट टाईम उमा म्हणून कृतज्ञतेने साइन ऑफ करेन. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहू दे" असे खुशबू म्हणाली.