Zee Marathi Comedy Show: झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. गेल्या १० वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण हा कार्यक्रम का प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्यामुळे विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. हे एपिसोड झाल्यानंतर शो बंद होणार आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. निलेश साबळेने शो सोडला. त्यानंतर या मालिकेचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे, कुशल बद्रिके करताना दिसले. कुशलने देखील झी मराठी वाहिनीचे आभार मानात एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर तो हिंदी शोमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली. आता, 'चला हवा येऊ द्या' बंद होणार असल्याचे समजते.
वाचा: चला हवा येऊ द्यामधून कुशल बद्रिकेची एग्झिट? अभिनेत्याने सांगितले सत्य
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चला हवा येऊ देचे चित्रीकरण आता थांबवण्यात आले आहे. मात्र, हा शोमधील ब्रेक आहे की फायनल पॅकअप आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: कुठला चित्रपट जिंकणार ऑस्कर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार पुरस्कार सोहळा
झी मराठीवाहिनीवर अनेक नव्या मालिका सुरु होत आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या वेळेत देखील एक नवी मालिका सुरु होत आहे. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय की नव्या वेळात भेटीला येते याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. झी मराठी वाहिनीकडूनही याबाबत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
'चला हवा येऊ द्या' आता बंद होणार असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमाचे 'होऊ दे व्हायरल', 'सेलिब्रिटी पॅटर्न', 'लहान तोंडी मोठा घास' असे पर्व आपण पाहिले आहेत. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
झी मराठीवर दोन नव्या मराठी मालिका सुरू होणार आहे. येत्या १८ मार्चपासून या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोज रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली. या मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमिजा पाटील, सानिका काशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.