मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मराठी मालिकांमध्ये पार पडणार कलाकारांच्या केळवणाचा थाट; पाहा कोणकोणत्या जोड्या अडकणार लग्न बंधनात

मराठी मालिकांमध्ये पार पडणार कलाकारांच्या केळवणाचा थाट; पाहा कोणकोणत्या जोड्या अडकणार लग्न बंधनात

May 29, 2024 11:48 AM IST

टीव्ही मालिकांमध्ये सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता या जोड्यांचा केळवण सोहळा रसिक प्रेक्षकांसोबत पार पाडला आहे.

मराठी मालिकांमध्ये पार पडणार कलाकारांच्या केळवणाचा थाट
मराठी मालिकांमध्ये पार पडणार कलाकारांच्या केळवणाचा थाट

लग्न म्हटलं की, मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे केळवणाचा जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्र परिवार नवं दाम्पत्यासाठी करतात. झी मराठीवरील गाजत असलेल्या आपल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य या जोड्या आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. आता मालिकांमध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता या जोड्यांचा केळवण सोहळा रसिक प्रेक्षकांसोबत पार पाडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकताच या जोड्यांच्या शाही केळवणाचा कार्यक्रमाच पार पडला. या खास कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे आणि अंकिता मेस्त्री यांनी केलं. यावेळी आशुला तर चक्क एका काकूंनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे, हे शिकवले. तर, कोणी लीलाला एजेला हसववण्याचा सल्ला दिला. आकाशने उखाण्याच्या खेळात बाजी मारली, तर उखाण्याच्या खेळात लीलाने, वसुंधरेच्या परीक्षकाची भूमिका पार पाडली. उपथित असलेल्या महिलांनी या जोड्यांचं औक्षण केलं. इतकंच नाही, तर आशीर्वाद ही इथे वेगळ्या पद्धतींनी दिले गेले. काही महिलांनी होणाऱ्या वर-वधूनां मोलाचे सल्ले दिले.

इस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ; आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन यांचा पॅलेस्टाईनला पाठिंबा!

केळवण विशेष साप्ताह!

येणाऱ्या नव्या आयुष्याची सुरुवात कशी करावी? नव नातं कसं बहरेल? या विषयी देखील सांगितले गेले. उत्कृष्ट जेवणानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी खास भेट ही दिली गेली. केळवण तर, या जोड्यांचे झाले. पण, यांचं लग्न नेमकं कसं पार पडेल? या प्रश्नाचं उत्तर सर्वाना २७ मे पासून झी मराठीवर सुरु होणाऱ्या विवाह विशेष सप्ताहात पाहायला मिळणार आहे. मात्र, या दरम्यान मालिकांमध्ये अनेक ट्वीस्ट देखील पाहायला मिळणार आहेत.

मालिकांमध्ये येणार नवे ट्वीस्ट

मात्र, आता या दरम्यान टीव्हीच्या या लाडक्या जोड्यांच्या आयुष्यात अनेक ट्विस्ट देखील येणार आहेत. एकीकडे अभिरामचं लग्न श्वेताशी व्हायला निघालं आहे. तर, वसू आणि आकाशच्या लग्नात एक मोठं सत्य लपवलं गेलं आहे. आशु आणि शिवा सोबत, पारू आणि आदित्य जोडीमध्ये देखील काही क्लेश निर्माण होणार आहेत. सगळ्या समस्यांना तोंड देऊन देखील या जोड्या आता एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहेत. मालिकांमधील हे रंजक वळण आता येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग