मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  किडनॅप झालेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे सापडले! कुठे आणि कसे जाणून घ्या सविस्तर

किडनॅप झालेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे सापडले! कुठे आणि कसे जाणून घ्या सविस्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 10, 2024 02:21 PM IST

३ जून रोजी अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे यांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. आता हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेचे अपहरण
अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेचे अपहरण

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील दोन नावे म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. त्या दोघांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण सध्या त्यांच्याविषयी एक वेगळी बातमी ३ जूनला प्रसारित करण्यात आली होती. दोघांचे अपहरण झाल्याचे म्हटले जात होते. आता दोघेही सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकं काय झालं होतं?

संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटी मधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले. तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हा सगळे कारनामा केला होता आपल्या छोट्या बचे कंपनीने. आता ही लहान मुले आणखी काय ड्रामा करणार हे लवकरच कळेल.
वाचा: शाहरुखचा लेक आर्यन खान ऑरीसोबत फोटो काढताना कधीच हासत नाही, काय आहे कारण?

काय आहे प्रकरण?

अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे झी मराठी वाहिनीवरील 'ड्रामा ज्युनियर्स' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार आहेत. या शोच्या प्रमोशनसाठी हा स्टंट करण्यात आला होता. दोन्ही कलाकारांचे अपहरण झाल्याची बातमी देण्यात आली होती. पण हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?

'ड्रामा ज्युनियर्स' कार्यक्रमाविषयी

'ड्रामा ज्युनियर्स' हा रिअॅलिटी शो झी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. या कार्यक्रमात लहानमुले त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करताना दिसणार आहे. तिच्यासोबत संकर्षण आणि अमृता परीक्षक म्हणून काम करणार आहेत. आता या लहान मुलांचा ड्रामा कधी पाहायला मिळणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा: दिग्दर्शकाच्या प्रेमात ते वडिलांवर फसवणूकीचा आरोप; जाणून घ्या अमिषा पटेलविषयी काही खास गोष्टी

अमृताच्या कामाविषयी

अमृता काही दिवसांपूर्वी लुटेरे या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या या सीरिजची बरीच चर्चा रंगली. त्यानंतर तिचा ‘पठ्ठे बापूराव’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आता झी मराठीवर तिचा नवा कार्यक्रम येत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४