'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

Aarti Vilas Borade HT Marathi
May 27, 2024 01:24 PM IST

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत सध्या येणारी वळणे पाहून प्रेक्षक वैतागले आहेत. प्रेक्षकांनी मालिकेचे नाव बदलावे असे थेट प्रोमोवर कमेंट करत म्हटले आहे.

appi amchi collector: 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी
appi amchi collector: 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी

झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत सतत काही ना काही घडत असल्याचे दिसत आहे. मालिकेत कलेक्टर अप्पी आणि पोलीस अर्जुनची कथा दाखवण्यात आली आहे. जवळपास सात वर्षांनंतर अप्पी आणि अर्जुन एकमेकांसमोर आले आहेत. त्यांचा मुलगा सिंबा हा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अर्जुनला अजूनही सिंबा हा त्याचाच मुलगा आहे माहिती नाही. सिंबा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता मालिका थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. वाहिनीने त्यांचा प्रोमो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. मात्र, हे पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अर्जुन करणार दुसरे लग्न

अप्पी आणि अर्जुन जवळपास सात वर्षे एकमेकांपासून लांब आहेत. त्यानंतर उत्तराखंडमध्ये त्यांची ओळख होते. तेथेच सिंबाची देखील ओळख होते. पण अर्जुनला अजूनही माहिती नाही की सिंबा हा त्याचा मुलगा नाही. अशातच अर्जुनच्या घरातले त्याचे दुसरे लग्न लावण्याचा प्रयत्न करतात. हे सिंबाला कळताच तो अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो.
वाचा: कोण आहे संजय लीला भन्साली यांची बहिण बेला सेहगल आणि शर्मिनची आई? वाचा

काय आहे मालिकेचा प्रोमो?

झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुनचे दुसरे लग्न होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. अर्जुन भूतकाळ मागे टाकून साखरपुडा तर करतो. पण तेवढ्यात तेथे सिंबा पोहोचतो. तो अर्जुनला आवाज देतो. अर्जुनला प्रश्न पडतो की सिंबा इथे का आला आहे. पण हा प्रोमो पाहून नेटकरी संतापले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाचा: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र, 'या' नाटकात साकारणार भूमिका

काय आहेत प्रेक्षकांच्या कमेंट?

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'सिरियलचे नाव बदला अप्पी बिनडोक कलेक्टर, नवरा तिचा बेअक्कल इन्स्पेक्टर' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने 'काय भंगार मालिका आहे' असे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रोमोची चर्चा रंगली आहे.
वाचा: बॉलिवूड कलाकारांवरही भारी पडली मराठमोळी छाय कदम, 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झाले 'या' सिनेमाचे स्क्रिनिंग

Whats_app_banner