झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अप्पी उत्तराखंडला अमोलला घेऊन गेली असते. अर्जुनपासून लांब आणि सगळे विसरुन नवी सुरुवात करण्यासाठी ती गेली असते. पण एका केस निमित्त अर्जुन तेथे येतो आणि सर्वकाही बदलते. अमोलला त्याचे वडील कोण आहेत हे कळाल्यानंतर तो अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. आता तर त्याने थेट अर्जुनच्या साखरपुड्याला अप्पीला नेले आहे. मालिकेत आता पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अर्जुनने बाबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आर्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतो. रुपाली बाबांची परिस्थिती बघून चिडलेली असते. ती अर्जुनकडून त्याच्या नकळत अप्पीला घटस्फोटाचे पेपर्स पाठवते. अप्पीच्या हातात घटस्फोटाचे पेपर्स आहेत आणि ते बघून तिच्या पाया खालची जमीन सरकते. तिला अमोलचे टेन्शन येते.
वाचा: तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
अमोल अप्पीने बाबाचे वर्णन केले होते त्यावरून एक चित्र काढतो. तो या सगळ्यामध्ये बापू, दिप्या, गायतोंडे, अप्पी या सर्वांची मदत घेतो. अमोल ते चित्र पूर्ण करायला लागतो. अप्पीला विनायकची परिस्थिती समजते आणि ती त्यांना जाऊन भेटून येते. तेव्हा रुपाली तिला विनायकने घेतलेल्या वचनाबद्दल सांगते आणि अर्जुन आणि आर्याचा साखरपुडा होणार असल्याचं सांगते. अप्पी तिकडून निघताना, विनायकची परिस्थिती आणि अर्जुनने विनायकला दिलेल्या वचनामुळे ती घटस्पोटाच्या पेपर्सवर सही करून पाठवते.
वाचा: हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
आर्याची आईला अर्जुनच्या पहिल्या लग्नाबद्दल समजते. ती अर्जुनला अप्पीसाठी आर्याला पुन्हा सोडून तर जाणार नाही ना? असा प्रश्न विचारते. अर्जुन त्यांना शब्द देतो की, तो परत अप्पीशी काहीही संबंध ठेवणार नाही. इकडे अमोल त्याने काढलेले चित्र घेऊन बाबाला शोधण्यासाठी निघतो. तो त्याच्या मास्टरच्या म्हणजेच अर्जुनच्या पोलीस स्टेशनला देखील जातो. तिकडे चिंचुकेला सिम्बाच अर्जुनचा मुलगा असल्याचे कळते. अमोल मास्टरसोबत बोलण्याचा हट्ट करतो आणि फोनवर अर्जुन त्याला साखरपुड्याला बोलावतो. अप्पीला अमोल मास्तरांच्या साखरपुड्याला गेला असल्याची शंका येते. ती मागच्या सगळ्या घटना आठवते. अर्जुनच अमोलचा मास्टर तर नाही ना अशी शंका तिच्या मनात येते.
वाचा: नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित
अर्जुनलाला कळेल का अमोलच त्याचा मुलगा असल्याचे सत्य ? अप्पी, अमोलला थांबवण्यासाठी अर्जुन-आर्याच्या साखरपुड्याला जाणार का? अमोल, अर्जुनला बाबा म्हणून हाक मारणार का? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहे.
संबंधित बातम्या