झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अप्पी, अर्जुन आणि अमोल यांची कथा दाखवण्यात आली आहे. या तिन्ही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहेत. आता मालिका थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अमोल आपल्या आई-बाबांना एकत्र आण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे. आता त्याच्या परिश्रमाला फळ मिळणार का याकडे सर्वांcचे लक्ष लागले आहे.
अमोल रोज काहीतरी रेखाटत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. जेव्हा दिप्या त्याला सतत प्रश्न विचारतो तेव्हा हे स्पष्ट होते की अमोल त्याच्या वाढदिवसाची चित्रे काढत आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा वाढदिवस ! दरम्यान, अप्पी आणि अर्जुन यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत आहे तेव्हा रुपाली आर्याला सांगते की अप्पी आणि अर्जुनमधील सर्वात मोठी लढाई फक्त एकाच गोष्टीवर असू शकते ती म्हणजे तत्त्वांवर! तिने अर्जुनच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला आणि रुपाली आणि आर्याने याचा वापर करून दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
इकडे अमोल त्याचे रेखाचित्र पूर्ण करतो आणि अप्पी आणि अर्जुनला दाखवतो. गेल्या सात वर्षांत त्यांनी काय गमावले हे दोघांच्या लक्षात येत. अप्पी आणि अर्जुन दोघांचेही डोळे पाणावतात. अर्जुन पहिल्यांदा कबूल करतो की त्याला अप्पीवर खूप राग आला होता, पण कुठेतरी तो तिची काळजीही करत होता. तो नेहमी अप्पी आणि अमोलसाठी प्रार्थना करायचा.
वाचा : मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे
अप्पीला असे वाटतं की आता सगळं संपलं आहे. तिच्या मनात अनेक गोष्टी येऊ लागतात. थोडे वाईट वाटून तिला रडायला येते. अर्जुन आर्याशी बोलण्याचा निर्णय घेतो. घरातले सगळे हा क्षण साजरा करायचं ठरवतात. त्याचवेळी, रात्री त्या दोघांसाठी सरप्राईज प्लॅन करत असताना, एक माणूस येतो आणि अर्जुनवर पुरावे सादर करत भ्रष्टाचाराचा आरोप करतो. या आरोपांमुळे अप्पी-अर्जुन मध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आगामी भागाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंधित बातम्या