अर्जुनने अप्पी-अमोलसोबत राहण्याचा घेतला निर्णय, 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये वेगळे वळण-zee marathi appi amchi collector serial 19th august 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अर्जुनने अप्पी-अमोलसोबत राहण्याचा घेतला निर्णय, 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये वेगळे वळण

अर्जुनने अप्पी-अमोलसोबत राहण्याचा घेतला निर्णय, 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये वेगळे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 19, 2024 11:51 AM IST

Appi Amchi Collector: 'अप्पी आमची कलेक्टर' मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेत आता अर्जुनने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने अप्पी आणि अर्जुनसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Appi Amchi Collector
Appi Amchi Collector

Appi Amchi Collector Update: झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अमोल हा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याचे हे प्रयत्न आता अपयशी ठरताना दिसत होता. आता अखेर मालिकेत अमोलचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अर्जुममे अप्पी आणि अमोलसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून प्रेक्षक देखील खूश झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना देखील अप्पी आणि अर्जुनला एकत्र पाहायचे होते. आता त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

अर्जुन राहातोय कुटुंबासोबत

'अप्पी आमची कलेक्टर' मालिका रंजक वळण घेत आहे. अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र येत आहेत. अर्जुन आर्याला सोडून अप्पी आणि अमोलसोबत राहण्याचा निर्णय घेतो. तसेच त्याने आर्य सोबतचा साखरपुडा देखील मोडला आहे. सर्वकुटुंब अर्जुनच्या निर्णयाचा आनंद साजरा करत असतात. तर रूपाली मनीला अप्पी आणि अर्जुनला वेगळे करण्याचा प्रयत्न करतेय.

मनीने चोरली कागदपत्रे

विनायक कौटुंबिक जमीन अमोलच्या नावे करतो आणि हे पाहून मनी कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न करते. अर्जुन अमोलची चित्र पाहून आश्चर्यचकित होतो. कुटुंबाचे लक्ष विचलित करण्यासाठी मनी सगळ्यांना मंदिरात जाण्याचा सल्ला देतो. मंदिरात अमोल आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. घरात कोणी नाही हे पाहून मनी जमिनीची कागदपत्रे चोरते. अप्पी आणि अर्जुनला मनी मावशीनेच हे सगळं घडवून आणल्याची खात्री पटते. अर्जुन आणि अप्पी तरीही मनी मावशीला जवळ ठेऊन , तिला धडा शिकवण्याची योजना आखतात . अप्पी-अर्जुनचा नवीन संसार कसा असेल? मनी मावशीला अप्पी आणि अर्जुन कसा धडा शिकवणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागणार आहे.
वाचा: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार

मनीने आखला नवा डाव

तसेच घरातील सगळे अप्पी, अर्जुन आणि अमोल आता एकत्र राहत असल्याने, देव दर्शनासाठी आणि फिरायला जाण्यासाठी मागे लागतात. अप्पी, अर्जुन आणि अमोल फिरायला गेले असताना मनी गाडीचा ब्रेक फेल करते ज्यांनी त्यांच्या गाडीचा ऍक्सीडेन्ट होते. अर्जुन अमोलला वाचवतो पण अप्पी गाडीतच अडकते. अप्पीला अर्जुन वाचवू शकेल ? की अमोलाचं आपल्या आई-बाबांना एकत्र पाहायचं स्वप्न अपूर्ण राहील ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

विभाग