Shilpa Shetty and Sara Ali Khan: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांचा गौरव करण्यासाठी काही पुरस्कार सोहळे आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा देखील समावेश आहे. या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. नुकताच ‘झी गौरव २०२४’ सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४ सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ जी आपल्या स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असते आणि दुसरी ‘सारा अली खान’
‘झी गौरव २०२४’ सोहळ्यात साराने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच 'आँख मारे' या गाण्यावर केलेल्या तडकत्या फडकत्या नृत्याने मंचावर आग लावली. तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. शिल्पाने या सोहळ्याला पांढऱ्या रंगाची पैठणी नेसली होती. तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधणार ठरला.
वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला जावई बनण्यास बोनी कपूरचा नकार?
‘झी गौरव २०२४’ सोहळा हा शनिवारी १६ मार्च रोजी संध्याकाळई ७ वाजता प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. शिल्पा शेट्टीचा आणि सारा अली खानचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. त्यामुळे चाहते १६ मार्चची वाट पाहात आहेत.
वाचा: ऑस्कर न मिळवणाऱ्यांसाठी बम्पर गिफ्ट! १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय?
शिल्पाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती काही दिवसांपूर्वी सुखी या चित्रपटात दिसली होती. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण तिचा हंगामा २ हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. पण चित्रपटाची चर्चा मात्र, रंगली होती. आता शिल्पा कोणत्या चित्रपटात दिसणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
सारा अली खान ही सध्या अनेक चित्रपटांमध्ये दिसत आहे. तिचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार असल्यामुळे चाहते उत्सुक आहेत. त्यासोबतच अय वतन मेरे वतन हा देशभक्तीपर चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.