Ajit Pawar: बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार? अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष-zee chitra gaurav puraskar 2024 ajit pawar on biopic ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ajit Pawar: बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार? अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष

Ajit Pawar: बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करणार? अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 06, 2024 07:40 PM IST

Ajit Pawar Biopic: भविष्यात अजित पवार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आला तर कोणता अभिनेता करणार याबाबत त्यांनी भाष्य केले आहे.

Ajit Pawar on Biopic
Ajit Pawar on Biopic

Ajit Pawar on Biopic: मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने पार पडणार आहे. यंदा या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित हे अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यांनी अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, बायोपिकविषयी केलेल्या भाष्याने सर्वांचे लक्ष वेधले.

‘झी गौरव पुरस्कार २०२४’ या कार्यक्रमात अजित दादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी ही ताज्या केल्या. कॉलेज जीवनाविषयी बोलताना ते म्हणाले, 'मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलेजच्या काळात मला अमिताभ बच्चन आवडायचे. नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड असते,' असंही अजित पवार म्हणाले.
वाचा: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?

पुढे अवधूत गुप्तने, 'जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा?' असा प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचे नाव घेतले. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्री देखील करून दाखवली. कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी 'थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल', असा सवाल विचारला तेव्हा दादांनी पार्थ पवार यांचे नाव घेतले.
वाचा: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

‘झी चित्र गौरव २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण ‘झी मराठी’ वाहिनीवर शनिवार १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर करण्यात येणार आहे. यंदा या कार्यक्रमाला सारा अली खान आणि शिल्पा शेट्टी या बॉलीवूड अभिनेत्री देखील उपस्थित होत्या.

Whats_app_banner
विभाग