Ajit Pawar At Zee Chitra Gaurav Awards: मराठी कलाविश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. गेल्या काही दिवसांपासूनन ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ची चर्चा रंगली आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित असतात. तसेच कलाकार उत्तम डान्सपरफॉर्मन्स सादर करताना दिसतात. यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने हजेरी लावली. तसेच तिच्यासोबत सारा अली खान देखील उपस्थित होती. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांची गायक-दिग्दर्शक अवधूत गुप्तेंनी खास मुलाखत घेतली. कार्यक्रमात विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना अजित पवारांनी अतिशय रंकजपणे उत्तरे दिली. एका रॅपिडफायर राऊंडमध्ये अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या या रॅपिड फायर राऊंडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?
अवधूत गुप्तेने अजित पवारांना विचारले की “थंड बर्फ कोणाला द्याल? कोणी डोक्यावर बर्फ ठेऊन स्वत:चे डोके शांत ठेवावे असे तुम्हाला वाटते?.” यावर अजित पवारांनी “हा बर्फ पार्थ पवारांना पाठवा” असे उत्तर दिले. याशिवाय हातात रिमोट दाखवत अवधूत गुप्तेने पुढे विचारले की, “रिमोट कंट्रोल खरोखर कोण वापरत आहे? आणि कोणाच्या हातात जायला हवा?” या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार म्हणाले, “तो माझ्याच हातात राहूदे!” ते ऐकून सर्वांना हसू अनावर झाले.
वाचा: 'तो काय काम करतो हे मलाही...', सेलिब्रिटींसोबत दिसणाऱ्या ऑरीबाबत रणवीरचे वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांची उत्तर ऐकून पुरस्कार सोहळ्यात एकच हशा पिकला असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या मुलाखतीदरम्यान भविष्यात बायोपिक काढल्यास माझी भूमिका निलेश साबळेने करावी असे देखील अजित पवारांनी सांगितले. ‘झी चित्र गौरव २०२४’ हा पुरस्कार सोहळला ‘झी मराठी’ वाहिनीवर शनिवार १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पाहाता येणार आहे. एकंदरीत पुरस्कार सोहळ्याचे प्रोमो पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. कलाकारांचे डान्स, त्यांचे संवाद, अजित पवारांची मुलाखत पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संबंधित बातम्या