Yuvraj Singh Father Reaction On Aamir Khan Movie : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी आपल्या 'किलिंग' वक्तव्यानंतर आणि हिंदी भाषेची खिल्ली उडवल्यानंतर आता बॉलिवूडवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योगराज सिंग यांनी आमिर खान आणि दर्शील सफारी यांच्या २००७मध्ये रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा जोरदार निषेध केला आहे. या चित्रपटाला त्यांनी 'थुकरट' चित्रपट असे संबोधले. ते असं नेमकं का म्हणाले? जाणून घेऊया...
योगराज सिंग यांनी युट्यूबर समदीश भाटिया यांना दिलेल्या मुलाखतीत पालकत्वाविषयी काही गोष्टींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ''वडिल जसे वागतात, जसे असतात, त्यांचे मूल देखील तसेच असते.' समदीशने योगराज यांना विचारले की, तुम्ही आमिर खानचा 'तारे जमीन पर' पाहिला आहे का? यावर योगराज म्हणतात की, ‘ही मी तो पाहिला आहे. तो अतिशय थुकरट चित्रपट आहे. मी असे सिनेमे बघत नाही.’
योगराज सिंग यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी महिला आणि शक्तीबद्दल अधिक वादग्रस्त विधाने केली, ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच टीका झाली आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या पत्नीला सत्ता दिली, तर ती तुमचे घर उद्ध्वस्त करेल. इंदिरा गांधींनी हा देश चालवला आणि बरबाद केला याचे मला वाईट वाटते. तिला आदर आणि प्रेम द्या, पण सत्ता कधीच देऊ नका.’ या महिलाविरोधी टिप्पणीने या आगीत आणखीच भर पडली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या अशा मतांवर टीका केली. आता ‘तारे जमीन पर’ हा थुकरट आणि हास्यास्पद चित्रपट असल्याचे म्हटल्यावर आता अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
आमिर खानचा 'तारे जमीन पर' खूप गाजला होता. निर्मात्यांनी १२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 'तारे जमीन पर' चित्रपट बनवला होता. सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जगभरात ९८.५० कोटी रुपयांची कमाई केली होती.
आमिर खान सध्या 'तारे जमीन पर'चा सिक्वेल बनवण्यात व्यस्त आहे. त्याने या सिक्वेलला 'सितारे जमीन पर' असे नाव दिले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जिनिलिया डिसूझा दिसणार आहे. आधी हा चित्रपट डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता हा चित्रपट २०२५ च्या मध्यात प्रदर्शित होणार आहे. 'सितारे जमीन पर'मध्ये नवीन व्यक्तिरेखा दिसणार असून कथाही 'तारे जमीन पर'पेक्षा खूप वेगळी असणार आहे.
संबंधित बातम्या