मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एक वर्षाची चिमुकली ठरली सर्वात श्रीमंत स्टारकिड, जाणून घ्या कोण आहे ती?

एक वर्षाची चिमुकली ठरली सर्वात श्रीमंत स्टारकिड, जाणून घ्या कोण आहे ती?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 28, 2024 02:06 PM IST

सध्या सोशल मीडियावर या स्टारकिडची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण ही एक वर्षाची स्टारकिड सर्वात श्रीमंत स्टारकिड ठरली आहे.

एक वर्षाची चिमुकली ठरली सर्वात श्रीमंत स्टारकिड, जाणून घ्या कोण आहे ती?
एक वर्षाची चिमुकली ठरली सर्वात श्रीमंत स्टारकिड, जाणून घ्या कोण आहे ती?

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी आयुष्यासाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या गाड्या, कपडे, ज्वेलरी, घरे चाहत्यांसाठी कायमच आकर्षण ठरत असतात. आजकाल या कलाकारांची मुले देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. पण या सगळ्या स्टार किड्समध्ये सध्या एका अशा स्टार किडची चर्चा सुरु आहे जी केवळ एक वर्षाची आहे. ही स्टार किड सर्वात श्रीमंत असल्याचे म्हटले जात आहे.

आता ही स्टार किड नेमकी आहे कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही स्टारकिड दुसरीतिसरी कोणी नसून राहा कपूर आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या लेकीचे नाव राहा आहे. राहा ही सध्याची सर्वात श्रीमंत स्टारकिड आहे. कारण रणबीर आणि आलियाने त्यांचा नवीन बंगला राहाला गिफ्ट केला आहे. राहा केवळ १ वर्षाची आहे आणि तिच्या नावावर हा संपूर्ण बंगला असल्यामुळे ती सर्वात तरुण आणि श्रीमंत स्टारकिडच्या यादीमध्ये समाविष्ठ झाली आहे.
वाचा: १२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट

रणबीर आणि आलियाने वांद्रे परिसरात जवळपास ५ ते ६ मजली बंगला बांधला आहे. ही उंच उमारत असलेला बंगला अभिनेता शाहरुख खानच्या मन्नतला देखील टक्कर देणार असे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वी रणबीरने या बंगल्याचे काम सुरु केले होते. आता त्याचे काम पूर्ण झाले आहे. या बंगल्याला सध्या रणबीरची आजी कृष्ण राज यांचे नाव आहे. पण थोड्या दिवसांनी त्याचे नाव राहा कपूर असे ठेवण्यात येणार आहे.
वाचा: १२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट

शाहरुखचा 'मन्नत' आणि अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'प्रमाणेच रणबीरचा हा आलिशान बंगला होणार आहे. या बंगल्याचे नाव थोड्या दिवसात राहा कपूर देण्यात येणार आहे. तसेच या बंगल्याची किंमत जवळपास २५० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप केले लग्न?

इन्स्टा बॉलिवूड या पेजने रणबीर आणि आलियाच्या या बंगल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच हा फोटो शेअर करत, 'अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने त्यांचा हा नवा बंगला मुलगी राहा कपूरला गिफ्ट केला आहे. राहा ही सर्वात तरुण आणि श्रीमंत स्टार किडच्या यादीमध्ये आली आहे. लवकरच रणबीर आणि आलिया त्यांच्या स्वप्नवत घरात राहायला जाणार आहे. त्यांचा हा कृष्ण राज बंगला मुंबईतील वांद्र परिसरात आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

IPL_Entry_Point