मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  योगयोगेश्वर जय शंकर : बाल शंकराला होणार ‘शिव अवतारा’चा साक्षात्कार
योगयोगेश्वर जय शंकर
योगयोगेश्वर जय शंकर (HT)
27 June 2022, 11:03 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 11:03 IST
  • सध्या मालिकेत शंकर महाराजांच्या बालपणाचा टप्पा उलगडतो आहे.

कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका सध्या अभूतपूर्व, अचंबित करणाऱ्या घटनाक्रमांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अवलिया सिद्धयोगी शंकर महाराज यांचा विस्मयचकित करणारा जीवन अध्याय उलगडणाऱ्या या मालिकेत सध्या शंकर महाराजांच्या बालपणाचा टप्पा उलगडतो आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दैवी लीला ही अजब असते आणि देव जेव्हा मानवी अवतारात प्रकटतो तेव्हा घडणारा ईश्वरी चमत्कार, प्रत्यय हा विलक्षण अनुभूती देणारा असतो. योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत असाच एक मोठा टप्पा येत्या २८ आणि २९ जूनला प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
आणखी वाचा: आईस्क्रीमच्या दुकानात काम ते हॉट सीट; वडाळ्याच्या अक्षय कदमचा प्रेरणादायी प्रवास

बाल शंकराला ‘कोsहम अर्थात मी कोण’ हा पडलेला प्रश्न श्री स्वामी समर्थांच्या एका दैवी संकेताने सोडवला जाणार असून क्षण दिव्य अनुभूतीचा, साक्षात्कार शिव अवताराचा असे अलौकिक वर्णन असलेला हा सुवर्ण क्षण प्रेक्षकांना योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत अनुभवता येणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग