Yek Number: राज ठाकरेंची झलक अन् नवा अभिनेता; मराठी चित्रपटांचा चेहरामोहरा बदलण्यात यशस्वी ठरेल का ‘येक नंबर’?-yek number marathi movie poster out the glimpse of raj thackeray and new actor excites fans ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yek Number: राज ठाकरेंची झलक अन् नवा अभिनेता; मराठी चित्रपटांचा चेहरामोहरा बदलण्यात यशस्वी ठरेल का ‘येक नंबर’?

Yek Number: राज ठाकरेंची झलक अन् नवा अभिनेता; मराठी चित्रपटांचा चेहरामोहरा बदलण्यात यशस्वी ठरेल का ‘येक नंबर’?

Sep 04, 2024 05:09 PM IST

Yek Number Marathi Movie Poster Out: मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेण्याचे स्वप्न पाहणारा चित्रपट म्हणून आगामी ‘येक नंबर’कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Yek Number Marathi Movie Poster
Yek Number Marathi Movie Poster

Yek Number Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवे प्रयोग घडत आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून हटके आणि वेगळे विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेण्याचे स्वप्न पाहणारा चित्रपट म्हणून आगामी ‘येक नंबर’कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या दसऱ्याला प्रदर्शित होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरनेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. नवोदित अभिनेता धैर्य घोलप याच्या करारी नजरेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर, या पोस्टरवर राज ठाकरे यांची झलक देखील पाहायला मिळाली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात दिसून येत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. त्याची ही करारी नजर आणि गूढ संगीत प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. तर, या पोस्टरवरील एक नजर सगळ्यांच्याच मनात भरली आहे. ही नजर इतर कुणाची नसून, राज ठाकरे यांची असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मराठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील भव्य चित्रपट!

दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी या आगामी धमाकेदार चित्रपटासाठी एक असा नवीन चेहरा शोधला आहे, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे अभिनेता धैर्य घोलपचा हा रांगडा लूक या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटत आहे. निर्माती तेजस्विनी पंडित हिच्या मते, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या भव्यता आणण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या चित्रपटात अनेक कुशल तंत्रज्ञांचा सहभाग असून, प्रेक्षक या भव्यतेचा आनंद नक्की घेतील. मराठी सिनेमातील तांत्रिक भव्यतेचे उदाहरण म्हणून हा चित्रपट ओळखला जाणार असून, अजय-अतुल यांचे धमाकेदार संगीत या चित्रपटाला अधिकच प्रभावी बनवणार आहे. दसऱ्याच्या सणासुदीत हा चित्रपट मराठी चित्रपट प्रेमींना नवी ऊर्जा देणार, अशी अपेक्षा आहे.

पोस्टरने वाढवली उत्सुकता

या चित्रपटाचे मोशन पोस्टर भेटीला आल्यावर आता प्रेक्षक देखील खूप खूश झाले आहेत. या मोशन पोस्टरवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. ‘राज साहेब यांची झलक सुद्धा दिसली’, ‘डोळ्यातच दरारा आहे साहेबांच्या’, ‘राजकारणी धुरंदर’, ‘राजसाहेबांची नजर त्यांची झलक, त्यांचा डायलॉग, आणि कॅनव्हास पेंटिंग पोस्टर, नक्कीच काही तरी एक नंबर असणार’, अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

विभाग