मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivangi Joshi: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी
शिवांगी जोशी
शिवांगी जोशी

Shivangi Joshi: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी

16 March 2023, 10:42 ISTAarti Vilas Borade

Yeh Rishta Kya Kehlata Hai: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इंफेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' पाहिली जाते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इंफेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवांगीने स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये शिवांगी हॉस्पिटलमधील बेडवर असल्याचे दिसत आहे. तिच्या दोन्ही हाताला सलाइन लावण्यात आली आहे. तसेच ती नाराळ पाणी पित आहे. तिचे हे हॉस्पिटलमधील फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. सर्वजण ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे.
वाचा: अन् सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

शिवांगीने हे फोटो शेअर करत 'सर्वांना नमस्कार, गेले काही दिवस माझ्यासाठी कठीण होते. माझ्या किडनीला इन्फेक्शन झाले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की कुटुंबीय, मित्रपरिवार, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मी आता ठिक आहे. आपले शरीर, मन आणि आत्मा यांची योग्य काळजी घ्यायला हवी हे लक्षात आणण्यासाठी मी पोस्ट लिहिली आहे. तुम्हाला कायम हायड्रेटेड रहायला हवे' या आशयाचे कॅप्शन तिने फोटो शेअर करत दिले आहे.

शिवांगी ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आह.

विभाग