बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ये जवानी है दिवानी' तब्बल ११ वर्षांनंतर वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. २०१३ मध्ये जेव्हा 'ये जवानी है दिवानी' सिनेमागृहात दाखल झाला होता, तेव्हा पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १९.४५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण १८८.५७ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाने तीन दिवसात किती कमाई केली...
सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर 'ये जवानी है दिवानी' चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) बॉक्स ऑफिसवर १.२० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आणि चित्रपटाने २.४० कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी (रविवारी) चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि चित्रपटाने सव्वातीन कोटींचा व्यवसाय केला. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन १९५.४२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यापेक्षा ओटीटीवर बघायचा असेल तर नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 'ये जवानी है दिवानी'ला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३१८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Aaradhya Video: अचानक विमानतळावर उड्या मारताना दिसली आराध्या, नेमकं काय झालं?
'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित, कल्की कोचलिन, तन्वी आझमी आणि एवलिन शर्मा यांनीही या चित्रपटात काम केले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती हिरू जोहर आणि करण जोहरने केली आहे.