Year Ender 2024 : बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी यंदाच्या वर्षी साऊथमध्येही घातला धुमाकूळ! पाहा यादी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Year Ender 2024 : बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी यंदाच्या वर्षी साऊथमध्येही घातला धुमाकूळ! पाहा यादी

Year Ender 2024 : बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी यंदाच्या वर्षी साऊथमध्येही घातला धुमाकूळ! पाहा यादी

Dec 08, 2024 11:26 AM IST

Bollywood Celebs Worked In South: यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार्स साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसले. या वर्षी अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटातही पदार्पण केले आहे.

Bollywood Celebs Worked In South
Bollywood Celebs Worked In South

Bollywood Celebs Worked In South: गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूडचा दबदबा कमी झाला आहे. मात्र, साऊथ चित्रपटांची पकड मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत हिंदी सिनेसृष्टीतील स्टार्स आपले करिअर वाचवण्यासाठी साऊथची मदत घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार्स साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसले. या वर्षी अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटातही पदार्पण केले आहे.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन दाक्षिणात्य अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. पण, २०२४मध्ये त्यांनी रजनीकांत यांच्या 'वेट्टयान' या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र, त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. याशिवाय ते प्रभाससोबत 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटातही दिसले होता.

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरनेही यावर्षी साऊथमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा - पार्ट १' या चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने २९२.०३ कोटींची कमाई केली. सध्या जान्हवी कपूरचा साऊथ स्टार राम चरणसोबत एक चित्रपट सुरू आहे.

बॉबी देओल

अभिनेता बॉबी देओलने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'ॲनिमल' या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. मात्र या यशानंतरही तो यावर्षी एकाही हिंदी चित्रपटात दिसला नाही. पण, बॉबीने स्टार सूर्याच्या 'कंगुवा' या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याचे पदार्पण अपयशी ठरले कारण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला.

Rekha : इच्छा माझी पुरी करा म्हणत चाहता रेखाच्या गाडीसमोर झोपला अन्... अभिनेत्रीने शेअर केला भन्नाट किस्सा!

दिशा पाटनी

अभिनेत्री दिशा पाटनी बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. पण, या वर्षी ती दोन साऊथ चित्रपटांमध्ये दिसली. तिने प्रभाससोबत 'कल्की २८९८ एडी'मध्ये आणि सूर्यासोबत 'कंगुवा' सिनेमात काम केले. अभिनेत्रीने याआधी साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण देखील 'जवान'नंतर (२०२३) कोणत्याही हिंदी चित्रपटात दिसली नाही. पण यावर्षी ती प्रभाससोबत 'कल्की २८९८ एडी'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

सैफ अली खान

सैफ अली खानही हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. गेल्या वर्षी तो प्रभाससोबत 'आदिपुरुष'मध्ये दिसला होता. या वर्षीही तो 'देवरा: पार्ट १ ' मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

Whats_app_banner