बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. यामीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये तिने मुलाचे नाव काय ठेवले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
आर्टिकल ३७० या चित्रपटाच्या वेळी यामी गौतम ही प्रेग्नंट होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी ती फारशी दिसली नाही. सुरुवातीला यामीने प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर वक्तव्य करण्यास नकार दिला होता. पण नंतर यामीने सर्वांसमोर कबूली देत गूड न्यूज दिली. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहाभागी होणार नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते.
वाचा: उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
आज यामी गौतमने सोशल मीडियावर मुलगा झाल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामीला अक्षय तृतीयाच्या दिनी पुत्ररत्नाचा लाभ झाला. तिने लगेच या पोस्टमध्ये मुलाचे नाव देखील सांगितले आहे. 'आम्हाला सांगताना आनंद होत आहे की आमच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याचे नाव वेदवीद आहे. अक्षय तृतीयेच्या मूहुर्तावर त्याचा जन्म झाला. कृपया तुमचे आशीर्वाद त्याच्यावर कायम असू द्या' असे कॅप्शन यामीने शेअर केलेल्या फोटोवर लिहिले आहे.
वाचा: अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?
यामीने हा फोटो शेअर करत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्यांनी सूर्या हॉस्पिटल, तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी देखील यामीच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनंदन केले आहे.
वाचा: मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत
अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचा विवाह ४ जून २०२१ रोजी झाला होता. दोघांची पहिली भेट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते. दोघांनी २ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नाच्या ३ वर्षानंतर या जोडप्याला पूत्ररत्न झाला आहे.
संबंधित बातम्या