Article 370 Box Office Collection Day 8: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम अभिनित 'आर्टिकल ३७०' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य झांबळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा झाला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी किती कमाई केली? चला जाणून घेऊया...
'आर्टिकल ३७०' या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने ५.९ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ७.४ कोटी रुपये कमावले. आता आठव्या दिवशी चित्रपटाने २.७५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने गेल्या आठ दिवसात ३८.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत अजूनही घसरण झाली नसल्याचे दिसत आहे.
वाचा: अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ हॉलिवूड गाजवणार; इंग्रजी रिमेक येतोय!
पहिला दिवस- ५.९ कोटी रुपये
दुसरा दिवस- ७.४ कोटी रुपये
तिसरा दिवस- ९.६ कोटी रुपये
चौथा दिवस- ३.२५ कोटी रुपये
पाचवा दिवस- ३.३ कोटी रुपये
सहावा दिवस- ३.१५ कोटी रुपये
सातवा दिवस- ३ कोटी रुपये
आठवा दिवस- २.७५ कोटी रुपये
एकूण कमाई- ३८.३५ कोटी रुपये
या चित्रपटात यामीने एका एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आणि या राज्याचे जम्मू, काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. चित्रपटात ‘३७० कलम’ हटविण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास, आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप यांवर भाष्य करण्यात आले आहे.
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’वर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे कारण अद्याप समोर आले नसून, प्रमाणन मंडळानेही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आलेला ‘आर्टिकल ३७०’ पहिला भारतीय चित्रपट नाही. याअगोदर हृतिक रोशनच्या ‘फायटर’ व सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटांवरही आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती.