Worli Heat And Run : या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Worli Heat And Run : या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू

Worli Heat And Run : या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 09, 2024 08:06 AM IST

Worli Heat And Run : 'वरळी हिट अँड रन' प्रकरणात निधन झालेली महिला ही मराठमोळ्या अभिनेत्याची सख्खी पुतणी आहे. तिच्या निधनानंतर अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे.

worli hit and run
worli hit and run

Worli Heat And Run : वरळीमध्ये झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरुन गेली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला भरधाव गाडीने धडक दिली. या अपघातामध्ये ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिस या प्रकरणी चौकशी करत असताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीरचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेली महिला ही ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची पुतणी होती.

जयवंत वाडकर यांची पुतणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी कोळीवाडा येथे राहणारे नाकवा दाम्पत्य सकाळी मासे खरेदीसाठी ससून डॉकला गेले होते. दुचाकीवर परतत असताना वरळीतील अट्रिया मॉलजवळ त्यांना भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले. पण त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. निधन झालेल्या कावेरी नाखवा या मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी होती. या घटनेविषयी जयवंत वाडकर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना संताप व्यक्त केला.
वाचा: “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट

आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी

“या आरोपींना कठोर कायदा काढून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीने गाडी चालवणे ही केवळ विकृती आहे. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक माणसाला या सगळ्याची जाणीव पाहिजे. आपण गाडीसमोर साधा उंदीर जरी आला तरी थांबतो त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. इथे तर तुमच्या गाडीसमोर एखादी व्यक्ती येते आणि तुम्ही तिला फरफटत घेऊन जाता ही गोष्ट किती वाईट आहे. त्यानंतर गाडी तशीच सोडून पळून जाणे हे आणखी वेदनादायी आहे” या शब्दात जयवंत वाडकर यांनी संताप व्यक्त केला.
वाचा: श्रेया मोठा गेम झाला यार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुढे ते म्हणाले, “मी शासनाला एवढीच विनंती करेन की, कृपया या आरोपीवर दया दाखवू नका. कारण, तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तो रात्री बारमध्ये दारू प्यायला, अठरा हजारांचे बिल झाले. त्यावेळी मर्सिडीज गाडी होती मग, ही बीएमडब्ल्यू गाडी कुठून आली? त्याची मैत्रीण कोण आहे. याप्रकरणी शासनाने एकालाही सोडता कामा नये. मला पोलिसांवर विश्वास आहे आणि ते योग्य कारवाई करतील याची खात्री आहे. अशा लोकांना सोडू नये असे माझे प्रामाणिक मत आहे कारण, सध्या एका पाठोपाठ एक अशा घटना घडल्या आहेत. कावेरी माझी सख्खी पुतणी आहे. त्यामुळे याबद्दल मी अजून काय बोलू मला खरंच सुचत नाही.”
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!

Whats_app_banner