जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याने दिलाय एकच हिट सिनेमा, तरीही आहे ११ हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याने दिलाय एकच हिट सिनेमा, तरीही आहे ११ हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याने दिलाय एकच हिट सिनेमा, तरीही आहे ११ हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 03, 2024 02:50 PM IST

Worlds richest actor: सुपरस्टार शाहरुख खान, टॉम क्रूझ, ड्वेन जॉन्सन आणि जॉनी डेप यांच्यापेक्षा जास्त पैसा असलेला माणूस जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. आता हा अभिनेता कोण चला जाणून घेऊया...

The world's richest actor
The world's richest actor

World's richest actor: 'जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता' हे वाक्य ऐकले की डोक्यात अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांची नावे येतात. टॉम क्रूझ, जॉनी डेप, ड्वेन जॉन्सन आणि शाहरुख खान यांसारखे जगातील काही यशस्वी अभिनेते सर्वात श्रीमंत असावेत असे प्रेक्षकांना वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का ते सर्वात श्रीमंत आहेत परंतु सर्वाधिक श्रीमंत नाहीत. 'जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता' हा सन्मान अशा अभिनेत्याला मिळाला आहे ज्याने आजवर केवळ एक सुपरहिट सिनेमा दिला आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले. पण आता अभिनेता कोण आहे चला जाणून घेऊया...

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण?

जगातील सर्वात श्रीमंत पुरुष अभिनेत्यांच्या यादीत टायलर पेरी हे आश्चर्यकारक नाव आहे. अभिनेता, चित्रपट निर्माते आणि नाटककार असलेला टायलर अब्जाधीश आहे. सूत्रांनी (ब्लूमबर्ग, फोर्ब्स) दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे एकूण १.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. जी जगातील इतर कोणत्याही पुरुष अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. या यादीमधील आणखी एक आश्चर्यकारक नाव म्हणजे कॉमेडियन जेरी सीनफेल्ड. त्याच्याकडे देखील १ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

The world's top 5 richest actors and their net worth
The world's top 5 richest actors and their net worth

इतर श्रीमंत अभिनेते

'जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता' या यादीमध्ये आणखी काही कलाकारांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता ड्वेन जॉन्सन आहे. त्याच्याकडे ८९० दशलक्ष डॉलर इतकी संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आहे. त्याच्याकडे ८७ कोटी डॉलर इतकी संपत्ती आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या टॉम क्रूझकडे ८० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

जाहिर करण्यात आलेली यादी ही केवळ जगातील श्रीमंत अभिनेत्यांची आहे. त्यामध्ये महिला कलाकारांचा समावेश करण्याच आलेला नाही. जर महिला कलाकारांचाही समावेश केला तर जेमी गर्ट्झ ८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत पहिल्या क्रमांकावर येईल. तर टेलर स्विफ्ट आणि सेलेना गोमेझ या दोन्ही अब्जाधीश महिला कलाकारांचा देखील पहिल्या पाचमध्ये समावेश होईल.

टायलर पेरी कसा बनसला अब्जाधीश?

टायलर पेरीचे पैसे केवळ अभिनयातून नव्हे तर मनोरंजन विश्वातून येतात. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, त्याने माडिया आणि त्याच्या इतर चित्रपट, नाटकांच्या निर्मितीमधून बक्कळ पैसे कमावले आहेत. ही कमाई जवळपास ३२० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे २६७९ कोटी रुपये) आहे. पेरी हॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्यांपैकी ज्याने स्वतःचा स्टुडिओ खरेदी केला आहे. याव्यतिरिक्त, त्याचा वायकॉमसीबीएसशी करार आहे. या करारातून ६० दशलक्ष डॉलर्स (५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त) किंमतीचा २५% हिस्सा मिळतो. टायलरकडे ३३४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्याने २५११ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?

टायलर पेरीचे ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी माजी अभिनेत्री मेगन मार्कल यांच्याशीही खूप जवळचे संबंध आहेत. जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकेत गेले तेव्हा हे जोडपे पेरीच्या एका घरात (वाचा व्हिला) राहत होते.

Whats_app_banner