Most Expensive Movie : अबब! जगातील सगळ्यात महागड्या चित्रपटाचं बजेट होतं ३३२१ कोटी! तुम्ही पाहिलेला का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Most Expensive Movie : अबब! जगातील सगळ्यात महागड्या चित्रपटाचं बजेट होतं ३३२१ कोटी! तुम्ही पाहिलेला का?

Most Expensive Movie : अबब! जगातील सगळ्यात महागड्या चित्रपटाचं बजेट होतं ३३२१ कोटी! तुम्ही पाहिलेला का?

Published Feb 13, 2025 10:37 AM IST

Most Expensive Movie : आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे आणि त्याने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई देखील केली होती.

जगातील सगळ्यात महागड्या चित्रपटाचं बजेट होतं ३३२१ कोटी! तुम्ही पाहिलेला का?
जगातील सगळ्यात महागड्या चित्रपटाचं बजेट होतं ३३२१ कोटी! तुम्ही पाहिलेला का?

Worlds Most Expensive Movie : चित्रपटसृष्टीत नेहमीच मोठ्या बजेटचे चित्रपट बनवले गेले आहेत, परंतु काळाबरोबर त्यात आणखी वाढ झाली आहे. आता केवळ हॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतही महागडे चित्रपट बनत आहेत, जे जगभरातील बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहेत. हे चित्रपट त्यांच्या धमाकेदार व्हीएफएक्स आणि अ‍ॅक्शन सीक्वेन्स तसेच दिग्दर्शनामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. ज्यामुळे त्यांचे बजेट आणि कमाई दोन्ही वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात महागड्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने बजेट वसूल करून छप्परफाड कमाई केली होती.

आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे आणि त्याने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई देखील केली होती. या चित्रपटाने जगभरात इतकी कमाई केली की, आतापर्यंत इतर कोणताही चित्रपट त्याचा विक्रम मोडू शकलेला नाही. चित्रपटाची कथा, अ‍ॅक्शन आणि ग्राफिक्स इतके उत्तम होते की लोकांना हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावा असे वाटत होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.

१४ वर्षांपासून लोकांना आवडतोय चित्रपट!

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो चित्रपट १४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१४मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट इतके मोठे होते की, आतापर्यंत कोणीही इतक्या मोठ्या बजेटचा चित्रपट बनवू शकलेले नाही. एवढेच नाही तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केली होती की, सर्वांनाच आश्चर्य वाटले. आजही हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. प्रेक्षकही हा चित्रपट पुन्हा पुन्हा आवर्जून बघतात. हा एक हॉलिवूड चित्रपट आहे ज्याने भारतीय चाहत्यांचीही मने जिंकली. तुम्ही हा चित्रपट पाहिलेला का?

Suspense Movie : थ्रिल अन् रहस्याचा अनोखा मिलाफ, १ तास ४५ मिनिटांचा हा चित्रपट पाहून तुम्हीही हादराल!

काय होते चित्रपटाचे कथानक?

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन: ऑन स्ट्रेंजर टाइड्स' असे या चित्रपटाचे नाव असून, तो जगातील सगळ्यात महागडा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची कथा काल्पनिक होती. या चित्रपटाची कथा समुद्री चाच्या जॅक स्पॅरोभोवती फिरते. या चित्रपटात, जॅक स्पॅरो आणि बार्बोसा जादूच्या कारंज्याच्या शोधात निघतात, परंतु त्यांना आढळते की, डाकू ब्लॅकबियर्ड आणि त्याची मुलगी देखील ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना तो खूप आवडला आणि आजही तो लोकांना तितकाच आवडतो.

महागडे बजेट अन् छप्परफाड कमाई! 

रॉब मार्शल दिग्दर्शित या चित्रपटात हॉलिवूड स्टार जॉनी डेप समुद्री डाकू जॅक स्पॅरोच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट जगातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात प्रचंड यश मिळवले. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे $३७९ दशलक्ष अर्थात ३,३२१ कोटी रुपये खर्च झाले आणि बॉक्स ऑफिसवर त्याने $१ अब्ज म्हणजेच ८,७६२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला.

सगळेच चित्रपट ठरले हिट!

'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' चित्रपट मालिकेची सुरुवात २००३ मध्ये झाली. 'द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल' हा या मालिकेतील पहिला चित्रपट २००३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप कौतुक मिळाले. यानंतर, या मालिकेत आणखी चार चित्रपट बनवले गेले - 'डेड मॅन्स चेस्ट' (२००६), 'अ‍ॅट वर्ल्ड्स एंड' (२००७), 'ऑन स्ट्रेंजर टाइड्स' (२०११) आणि 'डेड मेन टेल नो टेल्स' (२०१७). या चित्रपटांमधील सर्वात प्रसिद्ध पात्र म्हणजे कॅप्टन जॅक स्पॅरो, ज्याची भूमिका जॉनी डेपने केली आहे. या चित्रपट मालिकेने जगभरात प्रचंड नफा कमावला आणि आजही लोकांना हे चित्रपट खूप आवडतात.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner