Guess This Bollywood Actress : वर्षानुवर्षे मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये आता इतके बदल झाले आहेत, की त्यांचे जुने फोटो पाहिले तर ओळखू देखील येत नाही. आता हा वरचा फोटो पाहून तुम्हाला वाटलं असेल की, ती ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांची नायिका आहे किंवा एखाद्या अभिनेत्रीची आई आहे. तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर एक काळ गाजवला असेल. अर्थात ही अभिनेत्री जुनीच आहे, मात्र तिने आमिर, सलमान आणि शाहरुख या बॉलिवूडच्या खान मंडळींसोबत काम केले आहे. सध्या ती एका लोकप्रिय कॉमेडी शोची परीक्षक देखील आहे.
सध्या या लोकप्रिय अभिनेत्रीच्या कॉमेडी शोने सगळ्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. होय, हा फोटो अर्चना पूरण सिंह हिचा आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत अर्चनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, '१९८२ बॉम्बे'. या फोटोवर देखील तारीख पाहायला मिळाली होती. या फोटोची आठवण सांगताना अर्चना पूरण सिंह हिने लिहिलं की, ‘हातात सूटकेस घेऊन मी पहिल्यांदा मुंबई या शहरात गेलो होते. या फोटोमुळे मला माझा पहिला चित्रपट मिळाला म्हणून माझं नशीबही लिहिलं गेलं. त्यामुळे माझी सुरुवात इथूनच झाली.’
अर्चनाच्या या फोटोवर आता लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं की, ‘अर्चना पूर्णपणे बदलली आहे.’ ‘ या खरंच तुम्ही आहात का?’, ‘तू ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांची अभिनेत्री दिसतेस’, अशा कमेंट्स देखील पाहायला मिळत आहेत. अर्चनाला काही लोकांनी ‘टाईमलेस ब्युटी’ असं लिहिलं आहे. काहीजणांनी तिचा हा फोटो ओळखलेला नाही. काहींनी हा फोटो कोणाचा असा प्रश्न विचारला आहे. तर, काही लोकांना अर्चना पूरण सिंह यांच्या 'श्रीमंत श्रीमती'चे दिवस आठवले आहेत.
अर्चना पूरण सिंह हिने ८०च्या दशकात ‘निकाह’, ‘जलवा’, ‘वो फिर आएगी’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नव्वदच्या दशकात तिने ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘राजा हिंदुस्थानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. शाहरुख खानच्या १९९८मध्ये आलेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील अर्चना पूरण सिंहची भूमिका छोटी पण मनोरंजक होती. अर्चनाने ‘मिसेस ब्रिगेंझा’ची भूमिका साकारली होती, जी आजही लोकांच्या स्मरणात आहे. अर्चनाने सलमान खानच्या ‘किक’मध्ये देवीलालच्या आईची भूमिका साकारली होती. सध्या अर्चना पूरण सिंह कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या टीममध्ये आहे. अजूनही तिला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
संबंधित बातम्या