मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी हातात घेतल्या काठ्या, पुढे काय झाले जाणून घ्या

Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी हातात घेतल्या काठ्या, पुढे काय झाले जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 14, 2023 11:35 AM IST

Gautami Patil: असे पहिल्यांदाच झाले असेल की गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला आलेल्या माहिलांनी हातात काठ्या घेतल्या आहेत. या कार्यक्रमात पुढे काय झाले जाणून घ्या

Gautami Patil
Gautami Patil

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. तिच्या कार्यक्रमाला तर तरुणाईचा अक्षरश: धुडगूस पाहायला मिळतो. गौतमी पाटीलकडून अश्लील नृत्य होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. या सर्वांमध्ये गौतमीच्या एका कार्यक्रमात अशी एक गोष्ट घडली ज्याची आता सर्वत्रच चर्चा रंगली आहे.

गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुफान रडा होता. त्यामुळे पोलीस अधिकारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तिच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. तरी देखील काही ना काही घटना या गौतमीच्या कार्यक्रमाला घडल्याचे पाहायला मिळते. आता चक्क महिला गौतमीच्या सुरक्षेसाठी येऊन उभ्या राहिल्या आहेत.
वाचा: सलमानच्या सिनेमाच्या सेटवर मुलींसाठी आहेत नियम; पलक तिवारीचा खुलासा

जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी गावकरी तयार करत होते. गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी ठाकर समाजातल्या महिलांनी आणि गावातील इतरही काही मातांनी सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून हातात काठ्या व दांडकी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. स्टेज समोरच्या बाजूला गावातील महिलांनी हातात दंडुके घेतल्याने कार्यक्रम विनाविघ्न पार पडला.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

WhatsApp channel

विभाग