Prajakta Mali On Marriage : मराठी चित्रपटसृष्टीतील एक तगडी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक क्षेत्रांत यश मिळवले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यानंतर अभिनयाच्या कारकिर्दीत प्रेक्षकांनी तिच्या वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या. या भूमिकांमुळे तिचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत. या सगळ्यांना आता अभिनेत्री लग्न कधी करणार, हे जाणून घ्यायचे आहे. यावर आता तिने स्वतः उत्तर दिले आहे.
प्राजक्ताच्या अभिनयाचे अनेक रंग समोर आले आहेत. ती केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर मोठ्या पडद्यावर देखील आपली छाप सोडत आहे. ‘पांडू’, ‘पावनखिंड’ या चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाच्या विविधता दाखवल्या. तिच्या अभिनयाची गोडी रसिकांना लागली असून, ती एक आघाडीची आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अभिनयाच्या क्षेत्रात यश मिळवत असतानाच प्राजक्ताने स्वतःचा एक ज्वेलरी ब्रँड देखील सुरू केला आहे. त्यामध्येही ती प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. तिच्या सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. प्राजक्ता तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर चर्चेत राहते आणि आपल्या फॅन्ससोबत जोडलेली असते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता, तिच्या कामावरून चर्चेचा विषय बनते. मात्र, सोशल मीडियावर ती कायमच आपल्या फॅन्सच्या लक्षात राहते, आणि तेही तिच्या सौंदर्यामुळे, नृत्य कौशल्यामुळे आणि प्रामाणिकपणामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहते. अनेक तरुण चाहते तिच्यावरील आपलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात आणि तिला ‘क्रश’ मानतात. यातच आता एका चाहत्याने तिला थेट लग्नासाठी प्रस्ताव दिला आहे.
इन्स्टाग्रामवर प्राजक्ताने एका प्रश्नोत्तर सत्रात आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एक चाहत्याने तिला विचारले, ‘तू माझ्या बरोबर लग्न करणार का? तुझ्यामुळे मी लग्न केलं नाही, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ या हटके प्रश्नावर प्राजक्ताने आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ती म्हणाली की, ‘माझं काही खरं नाही, तुम्ही करुन टाका. (सगळेच जे थांबलेत).’ प्राजक्ताची ही उत्तर देण्याची शैली पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
प्राजक्ताच्या कामाची अनेकांमध्ये चर्चा आहे, विशेषत: तिच्या चित्रपटाबद्दल. ‘फुलवंती’ चित्रपटात तिने निर्माती आणि अभिनेत्री म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला. या चित्रपटाने तिला अभिनयाचे आणि निर्मितीचे क्षेत्र आणखी विस्तारण्याची संधी दिली. तिच्या अभिनय, नृत्य आणि कार्यशक्तीची प्रशंसा सर्वत्र होत आहे.
संबंधित बातम्या