२३ जून रोजी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांचा विवाह सोहळा पार पडला. संध्याकाळी त्यांनी लग्नाचे ग्रँड रिसेप्शन ठेवले होते. पण सोनाक्षी आणि जहीर यांचा हा आंतरधर्मीय विवाहसोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ना हिंदु रितीरिवाजानुसार ना मुस्लिम रितीरिवाजानुसार त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर सोनाक्षी मुस्लिम धर्म स्विकारणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता त्यावर जहीरच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जहीरचे वडील रतन इक्बाल यांनी 'फ्री प्रेस जर्नल'शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुलाच्या आंतरधर्मीय लग्नावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी आपण सगळी माणसे आहोत. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम याने फारसा फरक पडत नाही असे म्हटले होते.
वाचा : सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीची पोस्ट
लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलणार का? असा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की, 'ती धर्मांतर करणार नाही आणि हे निश्चित आहे. ते दोघे अंतःकरणाने एकत्र आहेत. त्यामुळे या सगळ्यात धर्मा कोणता हे पाहिले जात नाही. माझा माणुसकीवर आणि मानवतेवर विश्वास आहे. हिंदू लोक देवाला भगवान म्हणाता आणि मुस्लिम लोक अल्लाह. पण सर्वात शेवटी आपण मानव आहोत. माझे आशीर्वाद कायमच सोनाक्षी आणि जहीरसोबत आहेत.'
वाचा : 'अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा', रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग
नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर सोनाक्षीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने २३ जून २०१७ रोजी तिने आपल्या मैत्रीचे नात्यात रुपांतर केले. त्याच दिवशी ही तारीख दोघांसाठी खास ठरली होती असे म्हटले. सोनाक्षीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२३.०६.२०१७) आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले होते जे सर्वात सुंदर आहे. आज त्या प्रेमाने आम्हाला सगळ्या अडचणींतून मार्गदर्शन केले आहे. हा सुंदर क्षण इथपर्यंत पोहोचला आहे जिथे आम्ही दोन्ही कुटुंबीयांच्या आणि दोन्ही देवांच्या आशिर्वादाने आता पती-पत्नी झालो आहोत.'
वाचा : मल्लिकाजान मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला मिळाले मोठे गिफ्ट, जाणून घ्या काय मिळाले