मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनय विश्व सोडणार? लग्नाआधी केलेलं मोठं वक्तव्य आता आलं चर्चेत!

Deepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनय विश्व सोडणार? लग्नाआधी केलेलं मोठं वक्तव्य आता आलं चर्चेत!

Jul 03, 2024 09:13 PM IST

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. अभिनेत्री सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देऊ शकते. दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांना एका वेगळ्याच प्रकाराची चिंता सतावत आहे.

Deepika Padukone
Deepika Padukone

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. दीपिका पदुकोण गर्भवती असली तरी, ती आपल्या हातातील कामं पूर्ण करत आहे. ‘कल्की २८९८ एडी’च्या प्रमोशनमध्ये दीपिका पदुकोण तिच्या हेवी बेबी बंपसह पोहोचली होती. यावेळी प्रभास आणि अमिताभ बच्चन दोघेही तिची खूप काळजी घेताना दिसले होते. मात्र, आता दीपिकाच्या फॅन पेजवर काही गोष्टी लिहिल्या जात आहेत. यात असे म्हटले जात आहे की, कदाचित ‘कल्की २८९८ एडी’ हा दीपिका पदुकोणचा हा शेवटचा चित्रपट ठरू शकतो. पण लोक असा विचार का करत आहेत? यामागचं कारण दीपिका पदुकोणचं एक जुनं वक्तव्य ठरलं आहे.

सप्टेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारी दीपिका पदुकोण 'माय चॉइस'च्या एका व्हिडीओमध्ये म्हणाली होती की, सुखी वैवाहिक जीवनासाठी ती अभिनय विश्व देखील सोडू शकते. त्यावेळी दीपिका पदुकोण बॉलिवूड स्टार रणवीर सिंहला डेट करत होती. इतकंच नाही, तर दीपिका पदुकोणने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला लहान मुलं खूप आवडतात आणि तिला स्वतःला देखील खूप मुलं हवी आहेत. दीपिका म्हणाली होती की, ती शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि होमी अदजानियाच्या मुलांसोबत खूप वेळ घालवते.

Viral News: कंगना रनौतच्या कानाखाली आवाज काढणारी महिला जवान नोकरीवर परतली? काय आहे सत्य?

डिलिव्हरीनंतर दीपिका पदुकोण अभिनय सोडणार?

अर्थात दीपिका पदुकोणसाठी हा काळ खूप खास आहे. पण, पहिल्या बाळाच्या प्रसूतीनंतर चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीला चित्रपटात पाहता येणार नाही हे खरं आहे का? या प्रश्नाचं उत्तर एकतर दीपिका स्वत: देऊ शकते किंवा तिचा नवरा रणवीर सिंह देऊ शकतो. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही आपल्या पहिल्या बाळाच्या प्रसूतीनंतर चित्रपटातील काम कमी केले होते. मात्र, ती कॅमेऱ्या मागे काम करत राहिली.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या कामात व्यस्त आहे दीपिका!

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'सिंघम अगेन'चा समावेश आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोण बऱ्याच काळापासून रोहित शेट्टीसोबत या चित्रपटाचं काम करत आहे. काहीच दिवसापूर्वी रोहित शेट्टीने घोषणा केली होती की, तो दीपिका पदुकोणला ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. यापूर्वी रणवीर सिंह, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्सचा भाग बनले आहेत.

WhatsApp channel