Gadar 3 Latest Update : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या 'गदर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची वाट पाहत आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाच्या उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर स्टारर ‘गदर ३’मध्ये कथा काय वळण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यास अजून बराच वेळ आहे, पण त्याआधी पुढच्या भागाचे अपडेट्स येऊ लागले आहेत. ‘गदर ३’मध्ये नाना पाटेकर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
गॉसिप कॉरिडोरनुसार, नाना पाटेकर ‘गदर ३’ या चित्रपटात झळकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात ते खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सनी देओलसोबत खलनायकाची भूमिका करायची असेल, तर सनी देओलने त्याला या सीनमध्ये मारताना दाखवण्यात काहीच अर्थ नाही, असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी 'लल्लनटॉप'शी बोलताना केलं आहे. कारण, अशावेळी चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या जगात चालवावी लागेल. यासंदर्भात अनिल शर्मा यांच्याशी चर्चा केल्याचे नाना यांनी सांगितले.
‘गदर ३’बद्दल अद्याप काहीही कन्फर्म झालेले नाही. मात्र, या चित्रपटाचा तिसरा भाग येणार, हे निश्चित झाले आहे. इतकंच नाही तर, अभिनेते नाना पाटेकर यांची यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. यावेळी जेव्हा नाना पाटेकर यांना विचारण्यात आले की, ‘गदर ३’ या चित्रपटात तुम्ही खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार का? तर, या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्याने सांगितले की, त्यांनी या कल्पनेवर आधीच चर्चा केली आहे. ‘गदर ३’च्या कथेबद्दल बोलायचे तर, या आधी दाखवण्यात आलेल्या गोष्टी अशा नाहीत की, त्या बदलता येणार नाहीत, असेही ते म्हणाले.
नाना पाटेकर सध्या आपल्या 'वनवास' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटात ते उत्कर्ष शर्मासोबत काम करताना दिसले आहेत. सिमरत कौर आणि राजपाल यादव देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा नाना पटेकर यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे.
संबंधित बातम्या