Aamir Khan: काय? आमिर खान पुन्हा लग्न करणार? रिया चक्रवर्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणाला…-will aamir khan get married again responding to rhea chakraborty s question the actor gave answer ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan: काय? आमिर खान पुन्हा लग्न करणार? रिया चक्रवर्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणाला…

Aamir Khan: काय? आमिर खान पुन्हा लग्न करणार? रिया चक्रवर्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणाला…

Aug 26, 2024 10:59 AM IST

Aamir Khan On Third Marriage: अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचे पॉडकास्ट सुरू केले आहे, ज्यामध्ये आमिर खानने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. या दरम्याने त्याने पुन्हा लग्न करण्यावर भाष्य केले आहे.

Aamir Khan: आमिर खान पुन्हा लग्न करणार?
Aamir Khan: आमिर खान पुन्हा लग्न करणार?

Aamir Khan On ReMarriage: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच सुपरस्टार आमिर खान वर्कफ्रंटसोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. आमिर खानने दोन लग्ने केली होती. त्याने १८ एप्रिल १९८६ रोजी रीना दत्तासोबत पहिले लग्न केले, ज्यापासून आमिरला जुनैद नावाचा मुलगा आणि आयरा नावाची एक मुलगी आहे. २००२मध्ये आमिरचं हे नातं संपुष्टात आलं आणि घटस्फोटानंतर रीनाने दोन्ही मुलांचा ताबा घेतला. त्यानंतर आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण रावसोबत लग्न केले आणि आमिरला आझाद नावाचा एक मुलगा आहे, जो सरोगसीद्वारे जन्माला आला.

आमिर खान पुन्हा लग्न करणार?

२०२१मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याची घोषणा केली होती. आता रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने, तो पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहे का? या  प्रश्नावर उत्तर दिले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती सध्या यूट्यूबवर पॉडकास्ट करत असून, तिचा चांगला मित्र आमिर खान या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. आमिर खानने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. लग्नाविषयी विचारले असता, आमिर खान म्हणाला की, लग्न हा कॅनव्हास आहे, जो दोन लोक एकत्र रंगवतात. 

Aamir Khan: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

तू पुन्हा लग्न करणार आहेस का? असे विचारले असता आमिर म्हणाला, ‘मी आता ५९ वर्षांचा आहे. मला वाटत नाही की, मी दुसरं लग्न करू शकेन. मला अवघड वाटतं. सध्या माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाशी जोडला गेलो आहे. मला मुलं, भाऊ-बहीण आहेत. मी माझ्या जवळच्या लोकांसोबत खूश आहे. मी एक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने काम करत आहे.’ 

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या २००७मध्ये आलेल्या 'तारे जमीं पर' या आयकॉनिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात व्यस्त आहे. 'सितारे जमीन पर' असं या सिनेमाचं नाव असणार आहे. जिनिलिया डिसूझा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आमिर सध्या 'सितारे जमीन पर'मध्ये व्यस्त!

या चित्रपटाची कथा डाऊन सिंड्रोमबद्दल असणार आहे. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि किरण राव यांनी केली आहे. अशा वैद्यकीय अवस्थेतून जात असलेल्या मुलांचे जीवन आणि अडचणी या चित्रपटाची कथा सांगणार आहे. आमिर खानचा शेवटचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' फार काही चांगला चालला नव्हता. ‘फॉरेस्ट गंप’चा हा हिंदी रूपांतर असलेला चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांनी नाकारला होता.

विभाग