Jhimma 2: 'झिम्मा २'मध्ये सोनाली आणि मृण्मयी का नाही?; दिग्दर्शक हेमंत ढोमेने सांगितले कारण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jhimma 2: 'झिम्मा २'मध्ये सोनाली आणि मृण्मयी का नाही?; दिग्दर्शक हेमंत ढोमेने सांगितले कारण

Jhimma 2: 'झिम्मा २'मध्ये सोनाली आणि मृण्मयी का नाही?; दिग्दर्शक हेमंत ढोमेने सांगितले कारण

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 29, 2023 07:44 PM IST

Jhimma 2 Casting: 'झिम्मा २' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात दिसलेल्या सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी या भागात का नाहीत? हे दिग्दर्शकाने सांगितले आहे.

Jhimma 2
Jhimma 2

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्या पाठोपाठ 'झिम्मा २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. पण झिम्मा चित्रपटाच्या पहिल्या भागात असलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले या दुसऱ्या भागात का नाही? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता स्वत: चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने यामागचे कारण सांगितले आहे.

हेमंत ढोमेने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला 'झिम्मा या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या भूमिका होत्या पण या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्या दोघी का नाहीते?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हेमंतने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात कोट्यवधींची कमाई

"झिम्मा चित्रपटात सोनालीने साकारलेले पात्र मैथिली आणि मी साकारलेले पात्र निखिल यांच्या गोष्टीचा शेवट गोड करण्यात आला होता. उगाच मला त्यात ड्रामा क्रिएट करायचा नव्हता. ओढून ताणून मला त्यात हवा भरायची नव्हती. तसेच रमाच्याबाबतीत आम्हाला वाटले की, ती पहिल्या भागात सारखे मुल व्हावे याबद्दल बोलत असते. त्याचे कनेक्शन देखील तुम्हाला झिम्मा-२मध्ये दिसेल. पण, जर प्रेक्षकांचे प्रेम लाभले, तर आम्ही झिम्मा ३ बनवला तर त्यात त्या दिसतील" असे हेमंत म्हणाला.

झिम्मा २ बॉक्स ऑफिस कमाई

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

Whats_app_banner