दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते कमल हासन यांची मुलगी, अभिनेत्री श्रुती हासन कायमच सर्वांचे लक्ष वेधून दिसत असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्रुतीने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आजवर काही अभिनेत्यांना देखील डेट केले आहे. पण नागा चैतन्यशी असलेले नाते बरेच चर्चेत होते. आज २८ जानेवारी रोजी तिचा ३६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
श्रुती हासन ही तिच्या चित्रपटांपेक्षा नेहमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रुतीचे नाव बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ते सामंथा रुथ प्रभूचा पूर्वश्रमीचा पती नागा चैतन्यपर्यंत बऱ्याच अभिनेत्यांशी जोडले गेले होते. एका मुलाखतीमध्ये श्रुतीने रणबीरसोबतच्या अफेअरच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर नागा चैतन्य आणि तिचे अफेअर असल्याचे म्हटले जात होते.
वाचा: …म्हणून मी उद्धव ठाकरेंना साथ द्यायचं ठरवलं; अभिनेते किरण माने यांनी सांगितलं कारण
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१३ साली नागा चैतन्य आणि श्रुती हासन एकमेकांना डेट करत होते. ते दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात होते. श्रुती आणि नागा चैतन्य लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. एक अवॉर्ड शोमधील त्यांची जवळीक पाहून या चर्चांना उधाण आले होते. पण नंतर त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली. विशेष म्हणजे या दोघांच्या ब्रेकअपचं जे कारण समोर आलं त्यामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले होते.
श्रुती आणि नागा चैतन्यच्या ब्रेकअप मागे तिची बहिणी अक्षरा असल्याचे म्हटले जात आहे. श्रुती, अक्षरा आणि नागा चैतन्य एका कार्यक्रमासाठी गेले होते. ज्यात श्रुती परफॉर्म करत होती. दरम्यान नागा चैतन्य आणि अक्षरा यांना तिथून निघायचे होते. पण श्रुती त्यांच्यासोबत जाऊ शकत नसल्याने नागा चैतन्यला तिने अक्षराला घरी सोडण्यास सांगितले होते. नागाला ते जमले नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर ब्रेकअप झाला. काही दिवसांपूर्वीच नागा चैतन्य आणि समांथाचा घटस्फोट झाला.