Salman Khan Bodyguard: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा बऱ्याच वर्षांपासून काम करताना दिसत आहे. सलमान जिथे जातो तिथे शेरा त्याच्यासोबत त्याची सावली बनून उभा असतो. सलमान नेहमीच शेराला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतो. शेरा हा इंडस्ट्रीतील हाय पेड बॉडीगार्डपैकी एक आहे. पण काही दिवसांपूर्वी शेरा हा कतरिना कैफला सुरक्षा देताना दिसला. ते पाहून सर्वांना प्रश्न पडला की सलमानचा बॉडीगार्ड कतरिनाला का सुरक्षा देत आहे. चला जाणून घेऊया...
शेराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो सलमान खानसोबत वर्षानुवर्षे जोडला गेला आहे आणि सगळीकडे त्याच्यासोबत जातो. यावेळी शेराने भाईजानव्यतिरिक्त तो हृतिक रोशन, कतरिना कैफ, करीना कपूर खान या कलाकारांना देखील सुरक्षा देत असल्याचे सांगितले. तसेच यामागे नेमके काय कारण आहे हे देखील त्याने सांगितले आहे.
शेराने नुकतीच 'झूम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शेराला विचारण्यात आले होते की, 'सेलिब्रिटींशिवाय तू आजवर इतर कोणाला सुरक्षा पुरवली आहेत का?' त्यावर उत्तर देत शेरा म्हणाला की, 'होय, आम्ही रुग्णालये, क्लब आणि प्रत्येक गोष्टीसाठी सुरक्षा देतो.' त्यानंतर शेराला सलमानचा बॉडीगार्ड आणि त्याच्यासोबत एकनिष्ठ असण्यावर प्रश्न विचारला आहे. लगेच शेराने, 'मी तुम्हाला करीना कपूर, कतरिना कैफ किंवा हृतिक रोशन या कुणासोबत दिसला असेल तर ते केवळ सलमान भाईमुळेच आहे. मी इतर कलाकारांसोबत दिसलो आहे, अन्यथा माझी निष्ठा फक्त माझ्या भावाप्रती आहे आणि ती कायम तशीच राहील' असे उत्तर दिले आहे.
वाचा: वन नाईट स्टँडपासून सुरू झाली 'या' कपलची लव्हस्टोरी, अभिनेत्रीने केले आहे शाहरुखसोबत काम
शेरा पुढे म्हणाला, 'आमची कंपनी केवळ बॉलिवूडलाच नाही तर हॉलिवूड कलाकारांनाही सुरक्षा देते. मुरी टायगर सिक्युरिटी नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी लोकांना सुरक्षा पुरवते. बाहेरून येणाऱ्या स्टार्स आणि गायकांना मी सुरक्षा देतो. मी मायकेल जॅक्सनलाही सुरक्षा दिली होती.' सलमान खानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच सिकंदरमध्ये दिसणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. तसेच सलमाम बेबी जान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच सलमानचा 'किक 2', 'द बुल' आणि 'सफर' हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.