बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या 'दिल से' या चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी केले होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भलताच पसंतीला उतरला होता. अलीकडेच मनीषा कोईरालाने शाहरुख सोबत दिल से चित्रपट झाल्यानंतर काम का केले नाही या मागचे कारण सांगितले आहे. आता हे कारण काय आहे नेमके चला जाणून घेऊया...
मनीषा कोईरालाने नुकताच 'झूम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने दिल से चित्रपटानंतर शाहरुखसोबत काम का नाही केले याविषयी खुलासा केला आहे. झूमशी बोलताना मनीषा कोईराला म्हणाली की, 'दिल सेनंतर मी आणि शाहरुखने एकत्र काम केले. पण ते काम फार लोकांपर्यंत पोहोचले नाही. काहींना त्या प्रोजेक्टविषयी देखील माहिती नाही.' तसेच त्यानंतर दोघांनी का एकत्र काम केले नाही याचे कारण शाहरुखलाच विचारा असे देखील मनीषा कोईराला म्हणाली.
मणिरत्नम दिग्दर्शित दिल से हा चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला होता. बॉलीवूड चित्रपटांच्या इतिहासातील हा एक आयकॉनिक चित्रपट आहे. यात शाहरुख खान आणि मनीषा कोईराला या दोघांच्याही अभिनयाला भरभरून प्रेम मिळालं. मनीषा कोईराला पुढे म्हणाली, 'या इंडस्ट्रीत हिरोईन नाही, हिरो ठरवतो की त्याला कुणासोबत काम करायचे आहे आणि कुणीसोबत नाही.' पुढे मनीषाने तिला मणिरत्नम यांचा बॉम्बे, संजय लीला भन्साळी यांचा 'खामोशी', 'दिल से' आणि 'हीरामंडी' या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट काम म्हटले आहे.
वाचा: सैफ अली खानवर दिल्लीतील नाइट क्लबमध्ये झाला होता हल्ला, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
दिल से हा चित्रपट समीक्षकांना चांगलाच आवडला होता, पण प्रदर्शनाच्या वेळी तो बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी होऊ शकला नव्हता. त्याच्या निराशाजनक कामगिरीबद्दल बोलताना मणिरत्नम म्हणाले होते की, त्याची हिंदी तितकीशी चांगली नसल्यामुळे असे होऊ शकते. मणिरत्नम यांनी असेही सांगितले की, जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते, तेव्हा दृश्ये शूट करण्यासाठी त्यांना कलाकारांवर खूप अवलंबून राहावे लागले होते. 'दिल से' हा चित्रपट 21 ऑगस्ट 1998 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रीती झिंटासोबत मनीषा कोईराला आणि शाहरुख खान देखील होते. या चित्रपटातील एअर रेहमानची गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात.