मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!

‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!

May 23, 2024 09:58 AM IST

‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंतचे चारही सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनीच केले होते. मात्र, पाचव्या सीझनमधून त्यांचा पत्ता कट झाला आहे.

‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!
‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!

नुकतीच ‘बिग बॉसच्या सीझन ५’ची घोषणा झाली आहे. प्रेक्षक देखील ‘बिग बॉस मराठी’चा पुढचा सीझन बघण्यासाठी आतुर झाले होते. ‘बिग बॉस मराठी’ म्हटलं की डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे महेश मांजरेकर. मात्र, यावेळेस प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५चं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांच्याऐवजी अभिनेता देशमुख करणार आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये रितेश देशमुखला पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, महेश मांजरेकरच हवे होते, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया देखील पाहायला मिळतेय. या नव्या सीझनमध्ये महेश मांजरेकर का नाहीर, त्याचं कारण नुकतंच समोर आलं आहे. स्वतः महेश मांजरेकर यांनी दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण स्पष्ट केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंतचे चारही सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनीच केले होते. मात्र, पाचव्या सीझनमधून त्यांचा पत्ता कट झाला आहे. तर, आता या शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसणार आहे. महेश मांजरेकर नाहीत म्हणून अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. महेश मांजरेकर यांची बोलण्याची शैली, त्यांची चावडी आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची स्टाईल सगळ्यांनाच आवडली होती. मात्र, पाचव्या सीझनमध्ये तेच दिसणार नसल्याने प्रेक्षकांची निराशा झाली.

११ मेच्या दिवशी बच्चन कुटुंबात नेमकं काय झालं की ऐश्वर्या रायचा हातच मोडला! अभिनेत्रीच्या हातावर होणार शस्त्रक्रिया

महेश मांजरेकर नसण्याचं नेमकं कारण काय?

‘बिग बॉस मराठी सीझन ५’ सूत्रसंचालन महेश मांजरेकर का करणार नाहीत, त्याचे उत्तर त्यांनी स्वतः दिले. मीडिया रिपोर्टनुसार, महेश मांजरेकर यांचा ‘कलर्स मराठी’ वाहिनीसोबत असलेला करार संपला आहे. महेश मांजरेकर यांना स्वतः ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ होस्टिंग करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या हातात सध्या इतर अनेक प्रोजेक्ट्स आहेत आणि आधीच दिलेला कामाच्या कमिटमेंट्समुळे महेश मांजरेकर यांनी ‘बिग बॉस मराठी ५’चं सूत्रसंचालन करायला नकार दिला आहे. तसेच, त्यांचा करार संपला असल्यामुळे वाहिनीने देखील नव्या चेहऱ्याच्या शोधात रितेश देशमुख सोबत संपर्क साधला.

ताणून धरली प्रेक्षकांची उत्सुकता

यामुळेच महेश मांजरेकर यांच्याऐवजी या सीझनमध्ये रितेश देशमुख झळकणार आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ या वादग्रस्त शोचे आत्तापर्यंतचे चारही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता पाचव्या सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. मात्र, स्पर्धकांची नावे अद्याप गुलदस्तात ठेवण्यात आली असून, प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात आली आहे. लवकरच या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक दिसणार, हे समोर येण्याची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४