Madhuri Dixit: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Dixit: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा

Madhuri Dixit: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 28, 2024 02:06 PM IST

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने नुकताच एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने भारतात येण्यामागचे कारण सांगितले आहे.

Madhuri Dixit
Madhuri Dixit (HT Photo/Varinder Chawla)

आपल्या तालावर सर्वांना नाचवणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. अभिनय, सौंदर्य आणि नृत्य कौशल्याच्या जीवावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. ९०च्या दशकात माधुरी सुपरहिट अभिनेत्री होती. करिअर यशाच्या शिखरावर असताना माधुरीने १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर माधुरीने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि ती पतीसोबत परदेशात स्थायिक झाली. मात्र परदेशात स्थायिक झालेल्या अभिनेत्रीने भारतात येण्याचा निर्णय का व कसा घेतला याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

करिअरपेक्षा कुटुंबाला दिले माधुरीने महत्त्व

माधुरीने नुकताच ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला करिअरपेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर माधुरी म्हणली, “मला असं वाटतं, मला आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली. डॉ. श्रीराम नेने हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं. कारण, काम करत असताना आपली स्वत:ची सुद्धा अनेक स्वप्नं असतात. माझ्यासाठी माझं घर, नवरा, माझी मुलं, सगळे कुटुंबीय एकत्र माझ्याबरोबर असणं हे माझं स्वप्न होतं. जे मी पुरेपूर जगले.”

माधुरी मुंबईत का परतली?

पुढे माधुरी म्हणाली, “मुंबईत परतणं हा निर्णय आमच्या कुटुंबीयांसाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला होता. माझे आई-वडील माझ्याबरोबरच राहत होते आणि त्यांचंही वय झालं होतं. त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही सुद्धा परतण्याचा विचार केला. आई-बाबांनी सांगितल्यावर मग आम्हालाही असं वाटलं, अरे भारतात जायला काय हरकत आहे? आमची मुलं सुद्धा येथील संस्कृती, भारतातील विविध गोष्टी अनुभवू शकतात. कारण, परदेशात आपण एका कोशात वावरत असतो पण, इथे असं नाही आहे.”
वाचा: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

मुलांना भारतीय संस्कृती समजायला हवी

माधुरीने भारतीय संस्कृती विषयी देखील सांगितले आहे. “आपल्या देशात अनेक गोष्टी समजून घेता येतात. बेताच्या परिस्थितीतून मार्ग काढून लोक यशस्वी कसे होतात. हे सगळं माझ्या मुलांना समजणं गरजेचं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माझ्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती. याशिवाय माझं सगळं काम भारतातच होतं. त्यात माझ्या नवऱ्यालाही इथे काही नवीन गोष्टी सुरु करायच्या होत्या. त्यामुळे विचार करुन मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला” असे माधुरी म्हणाली.

Whats_app_banner