मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranut: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?

Kangana Ranut: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 05, 2024 08:32 PM IST

Kangana Ranut On Anant Ambani Pre-Wedding: कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Kangana Ranut
Kangana Ranut

Anant Ambani Pre-Wedding: जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय विवाहपूर्व सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. या प्रीवेडिंग फंकशनला जगभरातील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती यांनी हजेरी लावली. जामनगरमध्ये पार पडलेल्या या फंकशनची जोरदार चर्चा सुरु आहेत. या कार्यक्रमाला जवळपास संपूर्ण बॉलिवूड हजर असताना अभिनेत्री कंगना गैरहजर होती. याबाबत कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कधी तिच्या आगामी चित्रपटांविषयी तर कधी सामाजिक विषयांवर बेधकपणे वक्तव्य करताना दिसते. नुकताच कंगनाने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये कंगनाने अंबानींच्या पार्टीत डान्स करणाऱ्या कलाकारांना खडेबोल सुनावले आहेत. विशेष म्हणजे कंगाने या पोस्टमध्ये एक मुलाखत देखील शेअर केली आहे.
वाचा: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट

कंगनाने सोशल मीडियावर लता मंगेशकर यांची मुलाखत शेअर केली आहे. या मुलाखतीमध्ये त्या बोलताना दिसत आहेत की, 'मला कोणी जरी पाच लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही.' या पोस्टमध्ये कंगना राणावत ही आपली आणि लता मंगेशकरची बरोबरी करताना दिसत आहे. कंगना म्हणते की, मला कोणीही करोडो रूपये दिले तरीही मी कोणाच्या कार्यक्रमात परफॉर्म नाही करणार.
वाचा: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

कंगनाने या पोस्टवर, "मी आयुष्यात खूप आर्थिक संकटातून गेले आहे. लताजी आणि मी असे दोनच व्यक्ती आहोत ज्यांची गाणी खूप हिट आहेत (फॅशन का जलवा, घनी बावली हो गई, लंडन ठुमकदा, साडी गली, विजय भवा) पण तरीही मी लग्नात कधीच नाचले नाही. बऱ्याच प्रसिद्ध आयटम सॉन्गची मला ऑफरही आली. परंतू मी अवॉर्ड शोपासूनच अंतर ठेवले" असे म्हटले आहे.
वाचा: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्...; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर कंगनाची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी कंगनाच्या पोस्टचे समर्थन केले आहे. पण कोणत्याही कलाकाराने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंकशनमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामध्ये ‘फेसबुक’चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिलिसाचा देखील समावेश आहे. बॉलिवूडमधून शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, किरण राव, जितेंद्र, करीना कपूर खान, सैफ अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीश्मा कपूर, रितेश देशमुख, जिनिलिया, दीपिका पादूकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली.

अनंत अंबानीचे कधी होणार लग्न?

गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

WhatsApp channel