Sreeleela Trolled After Pushpa2Cameo Song:अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटातील प्रत्येक गाण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.ज्याप्रमाणे चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रत्येक गाण्याने खळबळ उडवून दिली, त्याचप्रमाणे चित्रपटाच्या दुसऱ्या भागातूनही धमाका पाहायला मिळेल, असे सगळ्यांनाच वाटत आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहेत. मात्र, चित्रपटाचा नवा डान्स नंबर'किसिक' रिलीज झाल्याने आता सोशल मीडियावर युजर्सच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या गाण्याला आतापर्यंत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या गाण्याच्या अभिनेत्री श्रीलीला हिला खूप ट्रोल केले जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या...
नुकतेच ‘किसिक’ हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. एकीकडे अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांची जोडी या गाण्यात पाहायला मिळाली, तर दुसरीकडे काही लोक त्याची तुलना समंथाच्या'ओ अंटवा'सोबत करत आहेत.२०२१मध्ये 'पुष्पा: द राइज' मधील'ओ अंटवा' रिलीज झाले, तेव्हा हे गाणे सर्वत्र लोकप्रिय झाले होते. समंथाचा धमाकेदार डान्स,गाण्याचे बोल्ड बोल आणि शानदार डान्स मूव्हज यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. या गाण्यातील समंथाचा डान्स तर चर्चेचा विषय ठरलाच, पण तो अनेक महिने चर्चेतही राहिला. या गाण्याच्या प्रत्येक ओळीने रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या भागात श्रीलीलाच्या गाण्याची घोषणा झाली, तेव्हा चाहत्यांच्या खूप अपेक्षा होत्या.
आता जेव्हा'पुष्पा२: द रुल' मधील'किसिक' हा डान्स नंबर रिलीज झाला, तेव्हा चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. या गाण्यासाठी श्रीलीलाची निवड करण्यात आली असून हे गाणे'ओ अंटवा'शी जोडून चित्रपटाचे प्रमोशनही केले जात आहे. अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांची उत्कृष्ट जुगलबंदी या गाण्यात पाहायला मिळाली, पण इंटरनेटवर'ओ अंटवा'च्या तुलनेत ती फिकी मानली जात आहे.
श्रीलीला आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती, पण'ओ अंटवा'मध्ये जी एनर्जी होती, ती'किसिक'मध्ये दिसली नाही. यानंतर, सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या.अनेक सोशल मीडिया युजर्सनी या गाण्याला निराशाजनक म्हटले. एका वापरकर्त्याने लिहिले की, 'समंथाच चांगली होती', तर दुसऱ्याने याला'थोडा ठीक आहे, पण अल्लू अर्जुन आणि समंथा यांच्या तुलनेत काहीच नाही',असे म्हटले आहे. अनेक युजर्सनी श्रीलीला ट्रोल देखील करायला सुरुवात केली.