Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचे विभक्त होणे चाहत्यांसाठी अतिशय धक्कादायक होते. स्टार क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि मग एके दिवशी दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली. आता एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, दोघांमधील वाढत्या अंतराचे कारण हार्दिक पांड्याचा जास्तीत जास्त वेळ फक्त स्वतःबद्दल विचार करणे हे होते. नताशाने एकमेकांमध्ये बऱ्याच अंशी समतोल साधण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी होऊ शकली नाही, असे या जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.
टाईम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीने सांगितलं की, ‘हार्दिक नताशासोबत खूप आडमुठेपणाने वागत होता आणि फक्त स्वतःच्या मजेत असायचा. नताशाला आता हे नातं सहन करणं कठीण होत चाललं होतं. नताशा वैवाहिक आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर आली, जिथे तिच्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक असल्याचे जाणवले. त्यांनी एकमेकांशी समतोल साधण्याचा प्रयत्न केला, पण अस्वस्थता वाढत गेली. ही अशी प्रक्रिया होती जी कधीच संपत नाही आणि याच कारणास्तव, ती काही काळानंतर तिलाही या गोष्टींचा कंटाळा येऊ लागला. नताशाला जुळवून घेता येत नव्हतं, म्हणून तिने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला.’
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी मे २०२० मध्ये लग्न केले होते. फेब्रुवारी २०२३मध्ये या जोडप्याने पुन्हा एकदा हिंदू आणि ख्रिश्चन रीतीरिवाजांनी विवाह करत आपले नाते घट्ट केले होते. परंतु, त्यानंतर जुलै २०२४मध्ये त्यांच्या विभक्त झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या दोघांनीही संयुक्त निवेदन जारी करत आपल्या चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी सांगितले की, ते विभक्त होत आहेत, परंतु ते आपला मुलगा अगस्त्याचे सहसंगोपन करत राहतील.
नताशा आणि हार्दिकने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी परस्पर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की, आमच्या दोघांसाठी वेगळे होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक पांड्या अनन्या पांडे आणि जॅस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, सेलिब्रिटींनी यापैकी एकाही बातमीला दुजोरा दिलेला नाही.