मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf Birthday: अभिनेते अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज का देतात? जाणून घ्या

Ashok Saraf Birthday: अभिनेते अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज का देतात? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 04, 2024 01:08 PM IST

Ashok Saraf Birthday: आज ४ जून रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घ्या अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज का देतात…

Ashok Saraf: अशोक सराफ यांना ‘मामा’ का बोलतात
Ashok Saraf: अशोक सराफ यांना ‘मामा’ का बोलतात

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांचा आज ४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपण अनेकदा पाहातो की अशोक सराफ यांना 'मामा' म्हणून आवाज दिला जातो. पण त्यांना मामा का म्हटले जाते? हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

करिअरच्या सुरुवातीला केले बँकेत काम

सुरुवातीला अशोक सराफ हे बँकेत नोकरी करत होते. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर आजमावण्यासाठी त्यांनी या नोकरीला रामराम ठोकला. ८० ते ९०च्या दशकात नोकरी सोडून अभिनयात प्रवेश करताना अशोक सराफ यांना खूप ऐकावे लागले होते. त्यांनी जवळपास १० वर्षे ही नोकरी केली होती. पण आवड जोपासण्यासाठी त्यांनी नाटकात काम करणे सोडले नाही. ते सतत एक अभिनेता होण्याचे स्वप्न पाहात होते.
वाचा: सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!

मामा का म्हटले जाते?

अशोक सराफ यांनी आजवर जवळपास २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना जवळपास सर्वजण 'मामा' असे म्हणतात. पण त्यांना मामा का म्हटले जाते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरा मॅन होता. ते नेहमी अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून मुलीला म्हणायचे की हे बघ तुझे मामा. तेव्हा पासून त्यांना अशोक मामा हे नाव पडले. अनेकजण आजही अशोक सराफ यांना मामा म्हणून आवाज देतात.
वाचा: मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा

अशोक सराफ यांच्या कामाविषयी

अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘गंमत जंमत’, ‘फेका फेकी’, ‘आयत्या घरात घरोबा’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. त्यांचे हे चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहातात. मराठी चित्रपटसृष्टीमधील विनोदाचा बादशाह म्हणून कोणी ओळखलं जात असेल तर ते अशोक मामा आहेत. आजही त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट चाहते आवडीने पाहातात.
वाचा: सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?

टी-२० वर्ल्डकप २०२४