Jaya Bachchan News: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या पॉडकास्टमध्ये नव्या आई श्वेता नंदा आणि आजी जया बच्चनसोबत गप्पा मारताना दिसली आहे. दरम्यान, या पॉडकास्टच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या पत्नी म्हणजेच जया बच्चन यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचे कारण सांगितले आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का, की जया बच्चन सोशल मीडियापासून का दूर राहतात? तर, मग, त्यांचं हे उत्तर ऐकाच...
आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या जया बच्चन या बच्चन कुटुंबातील अशा एक सदस्य आहेत, ज्या सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणे पसंत करतात. सोशल मीडियापासून दूर राहण्याबाबत बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, लोकांना बच्चन कुटुंबाविषयी खूप काही आधीच माहित आहे. जया म्हणाल्या की, जेव्हा लोकांना सर्व काही आधीच माहित असते, तेव्हा मला ते पुन्हा इन्स्टाग्रामवर शेअर करण्याची अजिबात गरज वाटत नाही.
नुकत्याच रिलीज झालेल्या पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या’च्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये, जया बच्चन नात नव्या नवेली नंदा आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांच्यासोबत बोलताना म्हणाल्या की, ‘मी लहान असताना आम्हाला कॉल्स बुक करावे लागायचे आणि त्या वेळी फक्त दोन प्रकारचे कॉल असायचे, एक नॉर्मल आणि दुसरा इमर्जन्सी कॉल. जर, तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडशी बोलायचे असेल तर, तो इमर्जन्सी कॉल असायचा.’
जया आणि अमिताभ बच्चन यांचा प्रेमविवाह १९७३मध्ये झाला होता. त्यांना बॉलिवूडमधील क्लासिक कपल म्हंटले जाते. दोघांनी आपल्या लग्नाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत आणि ते सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. या पॉडकास्टमध्ये श्वेता इंटरनेटबद्दलही बोलताना दिसली. श्वेता बच्चन म्हणाली की, जेव्हा आम्ही मोठे होत होतो, तेव्हा आमच्याकडे इंटरनेट आले होते. तुमच्यावेळीही असे असते, तर अनेक गोष्टी सोप्या झाल्या असत्या. केवळ अभ्यास करणंच नाही तर, अनेक गोष्टी सहज करता आल्या असत्या.’ यावेळी तिघीही धमाल करताना दिसल्या होत्या. जया बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, जया बच्चन शेवट करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसल्या होत्या.