मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 18, 2024 10:08 AM IST

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी अलका कुबल यांना नकार दिला होता. यामागे काय कारण काय होतं हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं?
‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं?

आपल्या दमदार अभिनयानं मनोरंजन विश्वामध्ये आपलं नाव गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अलका कुबल यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. अलका कुबल यांचं नाव घेतल्यावर डोळ्यासमोर येतो तो चित्रपट म्हणजे माहेरची साडी. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने अलका कुबल यांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवलं. यानंतर अलका कुबल यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपट आणि मराठी मालिका केल्या. मात्र, त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती खुलासा केला की, संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी अलका कुबल यांना नकार दिला होता. यामागे काय कारण काय होतं हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला बन्साळी यांची प्रत्येक कलाकृती ही मोठ्या पडद्यावर नक्कीच गाजते. त्यांचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट देखील तुफान गाजला होता. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील एका भूमिकेसाठी अलका कुबल यांनी देखील ऑडिशन दिलं होतं. मात्र या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना थेट नकार दिला. याचा खुलासा नुकताच अलका कुबल यांनी एका मुलाखतीत केला आहे. यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्याबद्दलचा एक किस्सा देखील शेअर केला.

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

अलका कुबल यांना भन्साळींकडून यायचे फोन!

सुरुवातीला या चित्रपटात अलका कुबल यांना घ्यावं, अशी संजय लीला भन्साळी यांचीच इच्छा होती. त्यासाठी भन्साळी यांनी अलका कुबल यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी अलका कुबल या कलर्स मराठी वाहिनीवर एका मालिकेचं शूटिंग करण्यात व्यस्त होत्या. या मालिकेच्या निमित्ताने त्या सतत बाहेर असल्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन मधून त्यांना फोन देखील येत होते. त्यांनी लवकरात लवकर मुंबईला परतावं आणि ऑडिशन द्यावी, असं भन्साळी प्रोडक्शनकडून सतत म्हटलं जात होतं. मात्र, त्यावेळी अलका कुबल यांनी स्पष्ट शब्दात त्यांना आपण एका अमुक तारखेला मुंबईत येणार असल्याचं सांगितलं होतं.

म्हणून भन्साळींनी दिला नकार!

‘माझे आवडते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आहेत. मात्र म्हणून मी माझ्या दिलेल्या तारखा आणि शेड्युल असलेले शूटिंग सोडून किंवा रद्द करून येऊ शकत नाही’, असं अलका कुबल यांनी थेट म्हटलं. इतका वेळ मला फोन येतोय म्हणजे मला ही भूमिका मिळणारच याचा मला आनंद झाला होता, असं देखील म्हणतात. अलका कुबल यांनी पुढे सांगताना म्हटलं की, ‘मुंबईत आल्यावर मी संजय लीला भन्साळी यांना भेटायला गेले. मला वाटलं नव्हतं की, ते एवढा वेळ देतील. पण त्यांनी स्वतः माझी ऑडिशन घेतली. ऑडिशनच्या वेळेस माझा चेहरा इतका सिम्पल आणि सोबर होता की, ते पाहूनच संजयजी म्हणाले की, अलकाजी तुमचा चेहरा खूपच साधा वाटतोय. या भूमिकेसाठी लूक थोडासा वेगळा हवा आहे. त्यामुळे मी तुम्हाला या भूमिकेत कास्ट करू शकत नाही.’ मात्र, आजही अलका कुबल संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४