Don 3: 'डॉन ३'मध्ये शाहरुख खानची जागा रणवीरने का घेतली? दिग्दर्शक फरहान अख्तरने सांगितले 'हे' कारण-why did ranveer replace shah rukh khan in don 3 director farhan akhtar gave this reason ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Don 3: 'डॉन ३'मध्ये शाहरुख खानची जागा रणवीरने का घेतली? दिग्दर्शक फरहान अख्तरने सांगितले 'हे' कारण

Don 3: 'डॉन ३'मध्ये शाहरुख खानची जागा रणवीरने का घेतली? दिग्दर्शक फरहान अख्तरने सांगितले 'हे' कारण

Aug 13, 2024 08:23 AM IST

Don 3 Latest Update: ‘डॉन’ सीरिजच्या पुढच्या चित्रपटात शाहरुख खानऐवजी रणवीर सिंहला मुख्य भूमिकेत घेतल्याने लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता एका मुलाखतीत फरहान अख्तरने यामागचं कारण सांगितलं आहे.

'डॉन ३'मध्ये शाहरुख खानची जागा रणवीरने का घेतली?
'डॉन ३'मध्ये शाहरुख खानची जागा रणवीरने का घेतली?

Don 3 Latest Update: ‘डॉन ३’मध्ये रणवीर सिंह शाहरुख खानची जागा घेत असल्याचे समजताच किंगच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे शाहरुख खानचे चाहते याला विरोध करत असताना, दुसरीकडे रणवीर सिंहच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण, यावेळी डॉनच्या सिक्वेलसाठी फरहान अख्तरने शाहरुख खानची निवड न करण्यामागचं कारण तरी काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. एका पॉडकास्टमध्ये अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

‘डॉन’ सीरिजच्या शेवटच्या दोन हिट चित्रपटांनंतर तिसऱ्या चित्रपटात शाहरुख खानची जागा रणवीर सिंह याने का घेतली, असा प्रश्न राज शमानी यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये फरहान अख्तरला विचारला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, यावेळी त्याने शाहरुखसोबत चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. फरहान अख्तर म्हणाला की, त्याचे शाहरुख खानसोबत या चित्रपटाबद्दल बोलणे झाले होते. पण, दोघांमध्ये ‘डॉन ३’च्या स्क्रिप्टबद्दल बराच वेळ बोलणे झाल्यानंतर लक्षात आले की, काही गोष्टी सुसंगत वाटत नव्हत्या.

Munawar Faruqui: स्टँडअप शोमध्ये उडवली कोकणी माणसाची खिल्ली! 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकीला मागावी लागली माफी

आमचे विचार जुळले नाहीत!

फरहान अख्तर पुढे म्हणाला की, 'आम्ही सगळे प्रयत्न केले. काही कल्पनांबद्दल आम्ही बोललो, काही नवीन गोष्टी लिहिल्या. पण कुठेतरी... म्हणजे एकतर तो (शाहरुख खान) अशा गोष्टींबद्दल उत्सुक होता, ज्या मला योग्य वाटत नव्हत्या. किंवा मग मी अशा काही गोष्टींबद्दल खूप उत्सुक होतो, ज्या त्याला वाटत होत्या की, त्या चित्रपटात फीट होत नाहीत. मी काय म्हणू इच्छित होतो, हेच कळत नव्हते.

‘डॉन’ची कथा संपणार?

फरहान अख्तर म्हणाला, आमच्यात बरीच चर्चा झाली आणि मग हे सगळं घडलं. कारण काही वेळा पटकथेतील एखाद्या कल्पनेवर समन्वयाची गरज असते, पण ती होत नाही. फक्त त्या गोष्टी या प्रकरणात होऊ शकल्या नाहीत. म्हणून मग आम्ही म्हणालो की, आम्ही एकत्र दोन चित्रपट केले आहेत, जो खूप मजेदार अनुभव होता आणि तेवढीच धमालही आली. ‘डॉन ३’ या चित्रपटाला फरहानने नाव ठेवलं आहे ‘डॉन ३: द चेज एंड्स’. चित्रपटाला असं नाव दिल्याने ही कथा संपेल असं मानलं जात आहे. पण, या चित्रपटाशी संबंधित अनेक महत्वाचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.