Malaika Arora And Arjun Kapoor : बॉलिवूडच्या गाजलेल्या कपल्सपैकी एक म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. मात्र, गेल्या काही काळापासून दोघेही एकमेकांसोबत दिसत नसल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. इतकंच नाही तर, अर्जुन कपूरने या ब्रेकअपच्या वृत्ताला जाहीररीत्या पुष्टी दिली होती. आता ब्रेकअपनंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. पण, सप्टेंबर २०२४ मध्ये जेव्हा मलायकाच्या वडिलांचे, अनिल मेहता यांचे निधन झाले तेव्हा तिचा माजी प्रियकर अर्जुन कपूर धावत तिला आधार देण्यासाठी आला. अर्जुनला या कठीण काळात मलायकासोबत पाहून ते दोघे पुन्हा एकत्र आल्याचे बोलले जात होते. पण आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्यावेळी ते एकत्र का होते, याचा खुलासा स्वतः केला आहे.
मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी सप्टेंबर २०२४मध्ये खिडकीतून उडी घेत आपले आयुष्य संपवले होते. त्यांच्या निधनाने अभिनेत्री हादरून गेली होती. मलायका तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. अशा परिस्थितीत, वडिलांच्या जाण्यानंतर तिला एकटे वाटू नये, म्हणूनच माजी प्रियकर अर्जुन कपूर तिची साथ देण्यासाठी तिथे पोहोचला होता. या कठीण काळात अर्जुनने तिला साथ दिली.
दोघांना एकत्र पाहून लोक असा अंदाज बांधू लागले की, आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे आणि ते एकत्र आले आहेत. पण तसे काहीच नव्हते. अलीकडेच अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की,ज्या लोकांशी त्यांचे भावनिक नाते आहे, त्यांच्यासाठी तो नेहमीच त्यांच्यासोबत उपस्थित राहील. यासाठी तो कधीच नातं आहे की, नाही याचा विचार करणार नाही. मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर अर्जुनने याच नात्याने तिला प्रत्येक पावलावर साथ दिली.
अर्जुन कपूरने मुलाखतीत सांगितले की, 'जर माझे एखाद्यासोबत भावनिक बंध निर्माण झाले असतील, तर मी नेहमी चांगल्या-वाईटाची पर्वा न करता तिथे असेन. मला एखाद्या चांगल्या कामासाठी आमंत्रित केले तर मी तिथे असेन, तर माझ्या जवळच्या व्यक्तींना वाईट काळात माझी गरज भासली तरी मी तिथे असेन. मी असा व्यक्ती नाही की, ज्याचे बरेच मित्र आहेत, मी हे प्रत्येकासाठी करत नाही. जर ती व्यक्ती मला तिथे नको असेल, तर मी पूर्वीप्रमाणेच त्यांच्यापासून अंतर ठेवेन.'