विश्वसुंदरी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जरी सक्रिय नसली तरी सतत चर्चेत असते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळाले. आज १ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
१९९७ साली ऐश्वर्याने इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पाच दशकांच्या करिअरमध्ये ऐश्वर्याने अनेक रोमँटिमिक चित्रपटात काम केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल आहे. पण ऐश्वर्याने कधीही इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दिलेले नाहीत. पण धूम २ आणि ए दिल है मुश्किल या चित्रपटांमध्ये तिने थोड्या बोल्ड भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये तिला इंटिमेट सीन्स देण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
'द पिंक पँथर २' या हॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनवेळी ऐश्वर्याला एका पत्रकाराने इंटिमेट सीन देण्याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर ऐश्वर्याने संताप व्यक्त केला होता. 'तू एखाद्या चित्रपटात कपडे काढताना किंवा इंटिमेट सीन्स देताना का दिसत नाहीस?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्याने दिलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले.
'मी कधीही मोठ्या पडद्यावर इंटिमेसी किंवा न्यूडिटी एक्सप्लोर केलेली नाही. आणि भविष्यात असे काही करण्याचा माझा विचारही नाही' असे ऐश्वर्या म्हणाली होती. त्यानंतर तिने पत्रकाराला आणखी काही जाणून घ्यायची इच्छा आहे का? असा प्रश्न देखील विचारला होता. त्यानंतर ती लगेच म्हणाली, 'मला असे वाटत आहे की मी माझ्या गायनोकोलॉजिस्टशी बोलत आहे. तू पत्रकार आहेस आणि तसाच रहा.'
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नयिन सेल्वन २' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण चाहते ऐश्वर्याला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर आहेत. ऐश्वर्या ही जास्त करुन कमाई ही चित्रपट आणि जाहिरातींमधून होते. ती सर्वासाठी तगडे मानधन घेत असल्याचे बोलले जाते.
वाचा: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. २००७मध्ये दोघांनी लग्न केले आणि दोघांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. अभिषेक बच्चनने ऐश्वर्या राय बच्चनला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे, ज्यामुळे दोघांचे लग्न तुटणार आहे. पण खरंच तसं आहे का?